बेरोजगार मेळाव्यातील नौकरीवर लागलेल्या बेरोजगारांची यादी जाहीर करा:भाष्कर कावळे

चंद्रपूर/प्रतिनिधी:

  तिन महीन्यापूर्वी मोठ्या थाटामाटात महाबेरोजगार मेळाव्याचे आयोजन मा.पालकमंत्री तथा म.रा.अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर बामणी येथे आयोजीत केला होता. या महाबेरोजगार मेळाव्यात जवळपास 38000 हजार बेरोजगार युवकांनी नोंदणी केली होती.चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार दिला जाईल असे आश्वासन देऊन त्याची जाहीरातही मोठ्या जोमाने केली होती .याच मेळाव्यात 38000 हजार बेरोजगार युवक युवती पैकी जवळपास पाच हजार युवक युवतींना रोजगार दिला आहे असे सांगितल्या गेले व लवकरच नौकरीवर लागल्या गेलेल्या बेरोजगारांची यादी प्रसिद्ध करु असे सांगितले होते. परंतु अजुनपर्यंतही या मेळाव्यातील उपस्थीत 5000 बेरोजगारांच्या नौकरीचे यादी प्रसिद्ध केल्या गेली नाही. 

जिल्ह्यातील मेळाव्याला गेलेल्या बेरोजगारांनी या महामेळाव्याबद्दल आक्षेप घेतला होता, या मेळाव्यात भास्कर कावळे याने आक्षेप घेत एक विडीओ बनवला होता ज्यात येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा घेण्यात आलेला आहे हे  प्रलोभन असल्याचे त्याने म्हटले होते.

हा व्हिडीओ  वाऱ्याच्या वेगाने समाजमाध्यमावर फैलत गेला यानंतर भास्कर कावळे याला मारहाण देखील करण्यात आली होती. थेट तीन महिन्यांनंतर भास्कर कावळे यांनी चंद्रपूर जिल्ह्याधिकाऱ्यांनी निवेदन देऊन नोकरीवर लागलेल्या 5000 बेरोजगारांची यादी व नावे मागितलेली आहे.