वकिलांनी साजरा केला माजी न्यायाधीश अ‍ॅड.महेंद्र गोस्वामी यांचा वाढदिवस

 मनोज चीचघरे/पवनी भंडारा:

भंडारा जिल्ह्याचे जेष्ठ विधितज्ञ् व माजी न्यायाधीश अ‍ॅड.महेंद्र गोस्वामी यांचा वाढदिवस पवनी वकील संघाचे वतीने बार रूममध्ये साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पवनी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री.अजय यादव  होते. तर प्रमुख उपस्थितीत वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश तलमले, सचिव अ‍ॅड. योगिराज सुखदेवे, अ‍ॅड. खुशाल अंबादे, अ‍ॅड. लक्ष्मण देशमुख, अ‍ॅड. अनिल देशमुख, अ‍ॅड. राहुल बावने, अ‍ॅड. सुधाकर भुरे, अ‍ॅड. विनायक मेश्राम, अ‍ॅड. राजू काटेखाये, अ‍ॅड. मंगेश गजभिये, अ‍ॅड सुनील बंसोड, अ‍ॅड.रामटेके,अ‍ॅड. तुळसकर  सह अटर्नी रवी काटेखाये, विद्यानंद बनारसे, सदाशिव शेंदरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. मंगेश गजभिये यांनी केले. तर समारोपीय आभार प्रदर्शन अ‍ॅड. राहुल बावने यांनी केले.