जि.प.पदावनत मुख्याध्यापकांच्या सेवा ज्येष्ठता यादीत घोळ


मनसे शिक्षक सेनेचा आरोप

जिल्ह्यात ५३  पदे रिक्त
१३०  पदावनत शिक्षकांचा यादीत समावेश
शेकडो अतिरिक्त प्राथ शिक्षकांचे समायोजन रखडले
 नागपूर / अरुण कराळे:


मुख्याध्यापक सेवा ज्येष्ठता साठी इमेज परिणाम
जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग पहिली ते सातवी तसेच आठवी पर्यंतच्या उच्च प्राथमिक शाळेतील पटसंख्या मागील काही वर्षात १५० पेक्षा कमी झाल्यामुळे त्या शाळेतील उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना वेतन संरक्षण देऊन सहाय्यक शिक्षकांचे मूळ पदावर पदावनत करून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत ठेवण्यात आले.सद्यस्थितीत पटसंख्येच्या निकषानुसार ५३ शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा असून सदर रिक्त जागा भरण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी पहिल्यांदा प्रथम नियुक्तीच्या तारखेनुसार सेवा जेष्ठता ठरवून १३० पदावनतांची यादी जाहीर केली मात्र काही संघटनांच्या विरोधामुळे सदर यादी रद्दबातल करून दुसऱ्यांदा पूर्वी दिलेल्या पदोन्नत शाळेच्या रुजू तारखेनुसार यादी जाहीर करण्यात आली.
मात्र सदर यादीत सेवाजेष्ठ शिक्षकांवर अन्याय होत असल्याने पुन्हा घोळ निर्माण झाला असून जिल्ह्यातील ५३ शाळांची उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदे भरण्याचे काम रखडल्याने संपूर्ण जिल्ह्यात अतिरिक्त असलेल्या शेकडो प्राथ शिक्षकांचे समायोजन प्रलंबित आहे.पदावनत केलेल्या उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना मूळ पदावर म्हणजेच सहाय्यक शिक्षक म्हणून पदावनत केल्यामुळे त्यांची प्रथम नियुक्तीच्या तारखेनुसारच सेवाजेष्ठता ग्राह्य धरून व आरक्षणाच्या बिंदूनामावली नुसार उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरावी व अतिरिक्त प्राथ शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर, संजय चामट व मनोज घोडके यांनी केली आहे.