विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबरच इतर कोर्सेस मध्ये ही प्रविण्य मिळवावे: संतोष गोसावी

मायणी/सातारा:
सध्या युवकांना नोकरी मिळवत असताना आपल्या शिक्षणाच्या गुणवत्तेबरोबरच आपले इतर कोर्सेस मध्ये असलेले कौशल्य स्पर्धा परीक्षेत दाखवावे लागते तेव्हाच या परीक्षांमध्ये त्यांना यशस्वी होता येते तेव्हा टायपिंग ,कॉम्पुटर ,यांच्यासह शिक्षणाशी व नोकरीसाठी संलग्नित असणाऱ्या सर्व कोर्सेस मध्ये विशेष प्रविण्य मिळवण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे ,असे मत मायणी पोलीस दुरक्षेत्राचे सपोनि संतोष गोसावी यांनी व्यक्त केले . 

ते कॉलेज कॉर्नर टायपिंग व कॉम्प्युटर इस्टिट्यूट च्या २०१८ मध्ये मुंबई हायकोर्टच्या वतीने घेण्यात आलेल्या स्टेनो तसेच क्लर्क आणि शिपाई पदासाठी परीक्षांमध्ये इस्टिट्यूट चे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सायजीराजे मोकशी ,इन्स्टिट्यूट चे प्रमुख सचिन चौधरी,जेष्ठ पत्रकारांची यांची प्रमुख उपस्थिती होती

नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत कॉलेज कॉर्नर इस्टिट्यूट चे खटाव तालुक्यातील दुष्काळी भागातील सहा मुलांची शासकीय सेवेत निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे -म्हासुरने गावचे सुपुत्र देविदास माने यांची मुंबई मुख्य महानगर न्यायालय मध्ये (क्लर्क) ,अभिजित सानप (पडळ)ठाणे न्यायालय, रेणुका शिंगटे आणि रेणुका कांबळे (मायणी) यांची सातारा जिल्हा न्यायालय मध्ये तसेच मयूर कुंभार (मायणी) याची पुणे न्यायालयमध्ये स्टेनोग्राफर पदी निवड झाली तसेच प्रियांका घाडगे (पाचवड) हिची सातारा न्यायालयात शिपाई पदासाठी निवड झाली.

यावेळी डॉ मोकाशी म्हणाले, सध्याच्या आधुनिक सरकारी नोकरी मिळवणे हे जीवघेण्या स्पर्ध्येमुळे अत्यंत कठीण झाले आहे.परंतु प्रयत्नांना कष्टाची साथ असेल तर नक्कीच जीवनात आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

यावेळी यशस्वी विद्यार्च्यांचा पुष्फगुच्छ श्रीफळ, आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी देविदास माने, रेणुका कांबळे, यांनी मनोगत व्यक्त केले.तरकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ श्यामसुंदर मिरजकर यांनी आभार दत्ता कोळी यांनी मानले.