डिसेंन्ट फाऊंडेशनला स्वच्छतेबाबत पुरस्कार

जुन्नर /आनंद कांबळे

जुन्नर -महाराष्ट्र राज्याचे कृषि -पणन व फलोत्पादन पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या शुभहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव येथे डिसेंन्ट फाऊंडेशन चे संस्थापक *जितेंद्र बिडवई* याना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व  अकरा हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. 


डिसेंन्ट फाऊंडेशन च्या माध्यमातून *'कळी उमलताना'* या उपक्रमा अंतर्गत ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींसाठी तज्ञ वैद्यकीय महीला अधिकाऱ्यांमार्फत  वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करून ईको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन चे मोफत वाटप करण्यात आले आहे.


त्याचप्रमाणे *'संस्कार स्वच्छतेचा'* या उपक्रमा अंतर्गत आत्तापर्यंत ८० शाळांना स्वच्छता कीट वाटप केले आहे. 


तसेच  'किटक नाशकांचा सुरक्षित वापर' या उपक्रमा अंतर्गत अनेक शेतकर्यांना कृषी तज्ज्ञांचे मार्फत मार्गदर्शन करून मोफत संरक्षण पोषाख वाटप करण्यात आले आहे. याच कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला.