यशस्वी करिअरवर प्राचार्यासोबत संवाद

चंद्रपूर/ प्रातिनिधी

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य यांच्या एक दिवसीय कार्यशाळेत "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे 10 वी व 12 वी नंतरचे यशस्वी करिअर" या विषयावर उपस्थित प्राचार्यासोबत संवाद साधला. कार्यशाळेचे उदघाटन मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंट्टीवार (मंत्री, अर्थ नियोजन व वने,महाराष्ट्र राज्य) यांनी केले व चंद्रपूर जिल्ह्यात मिशन सेवा प्रकल्पातंर्गत तालुका स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा निर्धार केला. सुधीरभाऊ यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यातील अभ्यासिकांचे अकॅडेमिक व्यवस्थापनाची जबाबदारी आकार फाउंडेशन कडे सोपवलेली आहे. सुधीरभाऊ सारखे लोकप्रतिनिधी नेतृत्व प्रत्येक जिल्ह्याला लाभल्यास निश्चितच ग्रामीण व दुर्गम भागात एक रचनात्मक काम उभारले जाऊ शकते याचा प्रत्यय गेल्या दोन वर्षातील त्याच्या कल्पक व सक्षम नेतृत्वातून आला. 

राजीव गांधी कॉलेज व इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी चंद्रपूर ने या समारंभाचे सुव्यवस्थित आयोजन केले. समारंभाला संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.शफिक अहमद,  सचिव मा.श्री.पोटदुखे , प्राचार्य डॉ. खान व प्राध्यापकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमणानंतर प्राचार्य यांनी अशा कार्यशाळा त्यांच्या विद्यालयात आयोजित करणार असलयाचा मनोदय बोलून दाखवला.