वैद्यकीय अधिकाऱ्याची (walk-in-interview) दर सोमवारी भरती

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वैद्यकीय आस्थापनावर डॉक्टरांची असलेली कमी संख्या व त्यामुळे होणारा रुग्ण सेवेतील खोळंबा दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासकीय सेवेत काम करू इच्छिणाऱ्या डॉक्टरांसाठी वॉक - इन -इंटरव्यूह ( walk-in-interview ) दर सोमवारी सुरू केले आहे.

doctor साठी इमेज परिणाम
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय यामध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची कमतरता आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या संमतीनुसार जिल्ह्यांमध्येच एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वॉक - इन -इंटरव्यूह व्दारे भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या संधीचा एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टरांनी लाभ घ्यावा. तसेच ग्रामीण व शहरी भागात आपली वैद्यकीय सेवा उपलब्ध करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

महिन्यातील प्रत्येक आठवड्याच्या सोमवारला सकाळी 11 ते 2 या कालावधीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांच्या दालनात वॉक - इन -इंटरव्यूह होणार आहे. जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या व अन्यत्र काम करणाऱ्या डॉक्टरांनी या संधीचा फायदा घ्यावा व जिल्ह्यातील जनतेला आपली सेवा द्यावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.