फिस्कुटी ते चांदापूर रस्ता रुंदीकरणाचे काम निष्कृष्ट, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष गजानन कन्ट्रक्शन कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट, बांधकाम अभियंत्याच्या डोळ्यावर पडदा!








 चंद्रपूर.  जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चांदापूर ते फिस्कुटी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.  कामात कंत्राटदाराकडून निष्कृष्ट साहित्याचा वापर केल्या जात असून खोदकाम न करताच सुमार गरजेची  गिट्टी पसरवून काम  करीत  आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍याचे  या कामाकडे स्वतः डोळ्यावर पडदा बांधून घेत कंत्राटदाराला   वलय दिल्या जात असल्याचा आरोप  चंदापुरचे  माजी सरपंच अशोक मार्गनवार  यांनी केला आहे.  चांदापूर ते  फिस्कुटी हा अत्यंत  कमी वर्दळीचा असलेला रस्ता आहे.  मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी या रस्त्याला   रुंदीकरण करण्यासाठी  निधी सार्वजनिक बांधकाम  कडून उपलब्ध करून दिला.   त्यांनी आपल्या क्षेत्रात  विकासाच्या  कामाचा सपाटा सुरू केला.  मात्र या  रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे.  जसा शहरातील रस्त्यालाही लाजवेल या स्वरूपात रस्त्याचे काम सुरू आहे.  हे काम चंद्रपूर येथील गजानन कन्ट्रक्शन कंपनी करीत आहे मात्र  होत असलेल्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागांनी   आपल्या डोळ्यावर पडदा बांधून,  आंधळ्याची भूमिका  घेतल्याचे दिसून येत आहे.  रस्त्याचे रुंदीकरणाचे काम करीत असताना त्याचे मजबुतीकरण   होणे  गरजेचे आहे.  त्याकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूनी खोदकाम करून त्यावर मुरूम टाकून पाणी मारून रोलर  द्वारे दवाई करणे,  गिट्टी टाकने,  मुरूम टाकून त्यावर परत पाणी मारून रोलरने  दबाई करणे,  या पद्धतीने रस्त्याचे बांधकाम  होणे अपेक्षित असताना,  कंत्राटदार थातूर-मातूर काम करीत आहे.  या कंत्राटदाराकडून या   अगोदरही अनेक रस्त्याची कामे ही निष्कृष्ट दर्जाची झाल्याची अनेककांची बोंब असताना  सुद्धा त्यावर कुणाचे आशीर्वाद,  अभय आहे.  की यांच्या कामाकडे अभियंते  दुर्लक्ष करतात.  यापूर्वी झालेले आणि सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून, तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम होत असलेल्या परिसरात मुरमाच्या मोठ्या टेकड्या आहेत,  कंत्राटदार महसूल विभागाकडून परवाना न घेता येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी   अवैद्य मुरूम   वापरत आहे.  कंत्राटदार करीत असलेल्या कामावर देखरेख ठेवण्याची,  व काम योग्य नियमानुसार करून घेण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.  परंतु  मुल येथील  सार्वजनिक बांधकाम विभागाचे साखरे नामक अभियंता आपली जबाबदारी पार  पाडत  नसल्याचा आरोप   चांदापूरचे माजी सरपंच अशोक   मार्गनवार  यांनी केला आहे.  कंत्राटदार हे अधिकाऱ्यांना न जुमानता मन मर्जीने,  मुजोरी करून काम करीत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदार यांच्या संगनमताने हे काम सुरू असून या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून या कामाची चौकशी करून रस्ता रुंदीकरणाच्या काम नियमानुसार करावी अन्यथा काम बंद पाडू असा  इशारा  मार्गनवार  यांनी दिला आहे.