इटोली ते किन्ही रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे! कंत्राटदाराच्या मुजोरीचा अजून एक नमुना!
चंद्रपूर. - जिल्ह्यातील पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या बल्लारशा मुल विधानसभा क्षेत्रातील इटोली व किन्ही हे गाव या दोन्ही गावातील जाणारा रस्ता सार्वजनिक उपबांधकाम विभाग बल्लारपूर याच्या मार्फत चंद्रपुरातील गजानन कंट्रक्शन कंपनी ला साडेचार किलोमीटर रस्त्याच्या कामाचे कंत्राट दिले आहे .हा रस्ता चार किलोमीटर लांब व साडे पाच मीटर रुंद करण्याचे काम संबंधित कंत्राटदाराला दिले आहे. इटोली ते किन्ही या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून या कामात कंत्राटदाराकडून निष्कृष्ट साहित्याचा वापर केला जात असून खोद काम न करता सुमार गरजेची गिट्टी पसरवून त्यावर रोड लोलर फिरवून मरमत केली जात आहे. हा रस्ता गाव खेड्यातील मधुन जात असल्याने याकडे कुण्याही अधिकाऱ्यांचे लक्ष जात नसल्याने या रस्त्याच्या कामाचे बांधकाम हे कामचलाऊ पणाचे करीत असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला.आपल्या क्षेत्राचा विकास झपाट्याने व्हावा हा यांचा मागचा उद्देश असला तरी कंत्राटदार व संबंधित विभागाचे अभियंते याकडे निष्काळजी करीत असल्याचे दिसून येते. रस्ता रुंदीकरणाचे काम होत असताना त्यावर संबंधित बांधकाम विभागाने आपली जबाबदारी म्हणून त्या कामाकडे कटाक्षाने पाहिले जायला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. कंत्राटदाराच्या मुजोरीने दोन्ही बाजूला खोदकाम न करता, त्यावर मुरूम टाकने, परत गिट्टी टाकने, त्यावर मुरूम टाकून पाणी मारून लोलर ने दबाई करणे. या पद्धतीचे रस्त्याचे बांधकाम होणे अपेक्षित असताना कंत्राटदार थातूर-मातूर काम करीत आहे. या कंत्राटदाराने या परिसरात आतापर्यंत अनेक काम केलेले ही सर्व कामे याच पद्धतीचे झाल्याचे निष्पन्न होत आहे. तरी कुठलाही संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर चौकशी करून कारवाई करताना दिसून येत नाही.
संबंधित कामाबद्दल सार्वजनिक उप बांधकाम विभाग बल्लारपूर येथील उप अभियंता यांना विचारणा केली असता अशा प्रकारचे कुठलेही काम जर आढळले तर आम्ही कंत्राटदारावर कारवाई करू असे बोलते झाले. मात्र हे काम बांधकाम विभागाच्या नियमानुसार होईल त्यात कुठलीही हयगय केली जाणार नाही असे माध्यमाशी बोलताना सांगितले.
समधित कामावर कामगारांची पिळवणूक होत असून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार कंत्राटदाराकडून होत आहे. पुरुषांना फक्त तीनशे रुपये रोजी तर महिलांना दोनशे रुपये रोजंदारीवर राबवून घेत आहे त्यांच्या कुठल्याही नियमानुसार पीएफ नसून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या कंत्राटदाराकडून होत आहे. या सदर बाबीची कार्यकारी अभियंता यांनी चौकशी करून संबंधित कामावर असणाऱ्या कामगारांची पिळवणूक न होता त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. व संबंधित विभागाकडून होत असलेले काम हे योग्य नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे अशी या परिसरातील नागरिकाची मागणी आहे.