ग्रामपंचायत नागाळा (सी) ठरली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छतेची पहिला मानकरी!
ग्रामपंचायत नागाळा(सी)  ठरली संत गाडगेबाबा 
                 ग्राम स्वच्छतेची  पहिली मानकरी!
चंद्रपूर -  जिल्हा परिषद  चंद्रपूर मधील पंचायत समिती चंद्रपूर मध्ये येत असलेली नागाळा( सी)  ह्या  ग्रामपंचायतीला  सण 2018,  19 चा पाणीपुरवठा व स्वच्छता ,पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद  कडून संत  गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा पहिला पुरस्कार 50 हजार रुपये,  मानचिन्ह, प्रमाणपत्र    जिल्हा परिषदअध्यक्ष  माननीय देवरावजी भोंगळे यांच्या हस्ते नागाळाचे सरपंच  डॉक्टर  शरद रणदिवे यांना प्रधान करण्यात आला.  यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, उप गट विकास अधिकारी आत्राम, पंचायत समितीच्या सभापती सौ. वंदनाताई पिंपळशेंडे, उपसभापती चंद्रकांत धोडरे, पंचायत समिती सदस्यसदस्य,  ग्रामपंचायत सरपंच तथा उपसरपंच तसेच पंचायत समितीतील कर्मचारी यांची उपस्थिती होती.  या पारितोषिकाचे सर्व श्रेय ग्रामपंचायतचे सदस्य, ग्राम विस्तार अधिकारी, आणि समस्त नागाळा गट ग्रामपंचायत येत असलेल्या सर्व गावकऱ्यांना जात असल्याचे मत नागाळा येथील सरपंच यांनी  व्यक्त केले.