प्रत्येक कामगाराला त्याच्या हक्काचे घर देण्यासाठी कटिबद्ध : ना.सुधीर मुनगंटीवार
प्रत्येक कामगाराला त्याच्या हक्काचे घर देण्यासाठी कटिबद्ध


v मूल येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटप

v शेवटच्या पात्र बांधकाम कामगाराला साहित्य वाटप करण्याची हमी

v हक्काचे घर  व हक्काचे गॅस कनेक्शन घेण्याचे आवाहन

 

चंद्रपूर दि 15 सप्टेंबर : लोकांच्या स्वप्नातील घरांना आपल्या कष्टाने साकारणाऱ्या बांधकाम कर्मचाऱ्यांना देखील स्वतःची घरे मिळतील. त्यासाठी उपलब्ध सर्व योजनांमधून सबसिडी देण्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण असून बांधकाम कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन राज्याचे वित्तनियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

मुल येथील मा.सा. कन्नमवार सभागृहामध्ये आयोजित कामगारांना सुरक्षा किट वाटप कार्यक्रमामध्ये बोलतांना त्यांनी बांधकाम कामगारांच्या पाठीशी केंद्र व राज्य शासन असून आगामी काळात या सर्वांना आपल्या हक्काची घरे मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्याहस्ते बांधकाम साहित्याचे वाटप करण्यात आले. ज्या कामगारांना आज बांधकाम साहित्य मिळाले नाहीत्यांना नंतरच्या कार्यक्रमात बांधकाम साहित्याचे वाटप केले जाईल. जिल्ह्यातील शेवटच्या बांधकाम कामगाराला हे साहित्य वाटप होईपर्यंत वाटपाची मोहीम सुरू असेलअसे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व पात्र बांधकाम कामगारांना बांधकाम साहित्याची सुरक्षा किट वाटप करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रत्नमाला भोयरराजेंद्र गांधीप्रभाकर भोयरनंदूभाऊ रणदिवे ,जिल्हा कामगार कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त उज्वल लोयानिरीक्षक श्री. कुरेशी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले.

यावेळी उपस्थित कामगारांना संबोधित करताना जे कामगार श्रम करतात त्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी देखील प्रधानमंत्री अतिशय सकारात्मक असून सर्वांना स्वतःचे घर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. बांधकाम कामगारांना विशेष अनुदान त्यासाठी केंद्र शासन देण्याचा विचार करत आहे .अडीच लक्ष रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतून सध्या मिळत असून बांधकाम कामगारांना आणखी अडीच लक्ष रूपये शासनाकडून देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पाच लाख रुपयांपर्यंतचे घर आता प्रत्यक्षात उतरू शकतेया बाबीचा लाभ कामगारांनी घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.

या योजनेसाठी उपस्थित बहुतांश महिलांकडे आव्हान करताना त्यांनी सांगितले कीमहिला बचत गटाच्या अभियानांमध्ये देखील त्यांनी सहभागी व्हावे. जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यात लवकरच आपण स्वर्गीय सुषमा स्वराज महिला उद्योग भवनाची उभारणी करणार असून या माध्यमातून महिला आर्थिक सबलीकरणाचा मार्ग प्रशस्त करण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्हा धूर मुक्त जिल्हा करण्याचे आपले स्वप्न असून उपस्थित महिलांनी गॅस कनेक्शन साठी अर्ज करावेतअसे आवाहन देखील त्यांनी केले.या जिल्ह्यातील कोणत्याही समाज घटकातील महिलांना मोफत गॅस जोडणी दिली जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच तुमच्याकडे कोणतीही कार्ड असेल तरी तुम्हाला दोन व तीन रुपये दराने अन्नधान्याचे वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याचादेखील लाभ घ्यावाअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी त्यांनी या जिल्ह्यात केलेल्या विकास कामांचा आढावा सादर केला. गेल्या पाच वर्षात अनेक प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न केला. असून पुढील काळामध्ये सर्वाधिक एक योजनांची योग्य अंमलबजावणी झालेला जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव लौकिक असेल असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही जातीपातीचा विचार न करता सर्वांना समान न्याय देण्याचा आपला प्रयत्न यापुढेही सुरू असेल असेही त्यांनी शेवटी सांगितले.