गिरणार चौकात कर्तव्यावर असणाऱ्या ट्राफिक पोलिसाच्या सत्तरकेने गाडीसह दारूसाठा जप्त!
गिरणार चौकात कर्तव्यावर असणाऱ्या ट्राफिक पोलिसाच्या सत्तरकेने गाडीसह दारूसाठा जप्त!
 चंद्रपूर,  साडेअकरा वाजता  कस्तुरबा रोड ते महाकाली मंदिर कडे जाणाऱ्या गिरनार चौकात कर्तव्यावर असलेले ट्राफिक पोलीस यांना गाडीत काहीतरी असल्याचा संशय आल्याने गाडी क्रमांक एम एच 31 बीबी 78 70 या आवाहनास थांबवले असता त्या गाडीची चौकशी करताना  दारूने भरलेल्या दोन चुंगड्या  आढळल्या त्यात आर एस पॉईंट व काही बंपर आढळले.  अंदाजे वीस ते पंचवीस हजाराचा  दारू साठास गाडी जप्त करण्यात आली आहे.स्थानिक चौकात कर्तव्यावर असलेले ट्राफिक पोलीस विकास यांनी आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने गाडीला आपल्या ताब्यात घेऊन पुढील  चौकशी सुरू आहे. मात्र या गाडी चालकांनी  गाडी सोडून पळ काढला. गाडी चौकशी केली असता त्या गाडीत डॉक्युमेंट्स त्याचे आयडी  आढळून आले आहे.  चौकशी  स्थानिक गुन्हे विशेषस  पथक करीत आहे.
 चंद्रपुरात दारूबंदी झाली असली तरी ती मात्र या ना त्या मार्गाने दारू तस्कर दारूचा पुरवठा करीत असल्याचे  आढळून येत आहे.