स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बोबडे यांच्या नेत्रुत्वात एसएस धर्मकाट्यांवर सर्व कोळशाच्या ट्रकांची तपासणी ,लाखोंचा गबाळ बाहेर येण्याची शक्यता!स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बोबडे यांच्या नेत्रुत्वात एसएस धर्मकाट्यांवर सर्व कोळशाच्या ट्रकांची तपासणी सुरू. खनिकर्म अधिकारी कांबळे साखर झोपेत?
चंद्रपूर प्रतिनिधी :दिनचर्या

चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा माफियांची मोठी टोळी सक्रिय असून मागील दोन वर्षांपूर्वी कर्नाटका एम्टा व डब्ल्यूसीएल च्या खाणीतून कोट्यावधी रुपयांच्या कोळसा चोरी आणि त्यातून एका सूपरवायजर अग्रवाल नामक व्यक्तीचा चंद्रपूर येथे हिस्से वाटणी वादातून खून झाल्यानंतर ती आत्महत्या असल्याचे दाखविण्यात आले होते व हे प्रकऱणा दाबले गेले होते. या संदर्भात कर्नाटका एम्टा कोळसा खाणीतील जवळपास ४ लाख टन कोळसा चोरी गेल्याची तक्रार झाली आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या नेत्रुत्वात चौकशी सुद्धा करण्यात आली होती.मात्र “आंधळ दळत आणि बहीर पीठ खात” अशी गत कोळसा माफिया आणि प्रशासनाची झाली असल्याने कोट्यवधीच्या कोळसा चोरी प्रकरणाला थंड बस्त्यात टाकण्यात आले.
आता सुद्धा अशाच प्रकारचा कोळसा चोरीचा धंदा खुलेआम अवैध कोळसा टाल च्या माध्यमांतून होत असून पडोली ते घूग्गूस या मार्गावरील नागाडा या गावाजवळ असलेल्या बजरंग धर्मकाटा आणि एसएस धर्मकाट्यांशेजारी असणाऱ्या अवैध कोळसा टाल वर चोरीचा कोळसा येत असल्याचा प्रकार खुलेआम सुरू आहे. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय बोबडे यांनी आपल्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांना घेवून कोळसा टाल वर धाडी टाकल्या असून बजरंग धर्मकाट्यांवर जैन कोल च्या दोन ट्रक गाड्या पकडून घूग्गूस पोलिस स्टेशन येथे चौकशी करिता लावल्या आहे, व एसएस धर्म काट्यांवरील जवळपास १५ कोळसा ट्रक गाड्यांची कागदपत्रे तपासली जात आहे.या प्रकरणात काही राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींचा सहभाग असून अवैध कोळसा टाल चालविणारे व्यावसायिक हे खनिकर्म विभागाचे कांबळे आणि पोलिस प्रशासन यांच्या संगनमताने वेकोलीचा कोट्यावधी रुपयाचा चांगला कोळसा रोड सेल च्या नावावर खुल्या मार्केट मधे विकून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार सुरू असल्याची बाब उघड होत आहे. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बोबडे यांच्या नेत्रुत्वात चौकशी सुरू असून आता कोळसा चोरीचे प्रकरण बाहेर येणार की पोलिस प्रशासन नेहमी प्रमाणे हे प्रकऱण दडपणार हे पाहणे औस्तुक्याचे असून या प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून चौकशी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार देण्यात येऊन जिल्हा स्तरावर अवैध कोळसा चोरी प्रकरणाची चौकशी करण्याकरिता चौकशी समिती निर्माण करावी व जिल्ह्यातील सर्व अवैध कोळसा टाल बंद करावे अशी मागणी सुद्धा करण्यात येणार आहे.