रयतवारी कॉलरीत तृतीयपंथी(किन्नर)समुदायाकडून भोजनदान

रयतवारी कॉलरीत तृतीयपंथी(किन्नर)समुदायाकडून भोजनदान

चंद्रपूर :-  देशात  कोरोना वायरसने  थैमान घातले आहे.  सर्वीकडे लाँकडाऊन  असल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना  भूकमारीची पाळी आली आहे.  या परिस्थितीचा विचार करून रयतवारी येथील तेलगु शाळेच्या मागे तृतीयपंथी (किन्नर)   समुदायाने  दिनांक २/४/2020 ला  रयतवारी  येथील  गरजवंतांना भोजनदान  देण्यात आले.  यावेळी तृतीयपंथी समुद्राच्या प्रमुख पिंकी माँ,  आरती गंगोत्री,  साजन माँ,  आरती मॉ यांचे दत्तकपुत्र  पप्पू गंगोत्री, आदी तृतीयपंथी (किन्नर)  यांनी या कार्यक्रमास आपले मोलाचे सहकार्य देऊन गरजवंतांना भोजनदान देऊन एक समाजाप्रती असलेली जागृतता निर्माण केली.  यावेळी शेकडो  नागरिकांना भोजन  भोजनदान देण्यात आले.