75% रिकव्हरी सह नागपुर देशात सर्वात अवल्ल स्थानी
75% रिकव्हरी सह नागपुर देशात सर्वात अवल्ल स्थानी

नागरिकांना घरात राहण्याचे आव्हान करताना नागपुर आरोग्य विभगाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल

जगात थैमान घातलेल्या करोना वायरसमुळे सर्वचजण परिस्थीतीशी आपल्या परिने झूंज देत आहेत. नागरिकांना घरात राहण्याचे आव्हान करताना नागपुर आरोग्य विभगाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल तालुक्यातील व प्रत्येक गावातील ग्रामीण रूग्णालयावर बारकाइने लक्ष ठेवुन आहेत. डॉ. संजय जयस्वाल साहेबांचा जन्म व शिक्षण चंद्रपुर ज़िल्हयातील नागभीड येथे झालेले असुन त्यांचे वडील रेल्वे सेवेत नौकरीला होते. मुळचे नागभीडचे असलेले डॉ. जयस्वाल यांनी काही वर्ष गडचिरोली ग्रामीण रूग्णालयात बालरोग तज्ञ म्हनणुन सेवा दिलेली आहे व आज ते नागपुरात आरोग्य उपसंचालक म्हणुन कार्यरत आहे. प्रशासनाशी असलेली कर्तव्याची बांधिलकी अशा परिस्थितीत त्यांनी कर्तव्याला प्राधान्य देत करोना विरुध्दची लढाई जिंकण्यासाठी ते दोन महिन्यापासुन मैदानात ऊतरलेले आहेत. प्रशासनात कर्तव्य बजावताना प्रथम प्राधान्य हे नागरिकांच्या हिताला देण्याची त्यांची स्पष्ट भुमिका आहे. याबद्धल आम्हा नागभीडकरांना त्यांचा सार्थ अभिमान आहे. नागपुर शहरात करोना रूग्नांची संख्या सातत्याने पूढे येत असताना देशात करोना रूग्नांचे बरे होण्याचे प्रमाण 40.4% टक्के आहे. तर राज्यात करोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 26.3% टक्के आहे. तर नागपूरात करोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमान 75% टक्के इतके असुन नागपुर हे देशात सर्वात अव्वल स्थानी आहे. त्याबद्धल डॉ. संजय जयस्वाल साहेब व त्यांच्या सर्व सहकार्यांच मनापासुन अभिनंदन.


दिनचर्या न्युज
दिनचर्या न्युज