वणी येथील आमदार संजयरेड्डी बोदकुरवार यांच्याशी महा. ना. महा. जिल्हाध्यक्ष नक्षिणे यांची
विविध पैलूवर मागणी!
यवतमाळ :-प्रतीनीधी वणी
महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा यवतमाळ तालुका वणी यांनी वनी येथील आमदार संजय रेड्डी बोदकुरवार यांची भेट घेऊन, नाभिक समाजावर लाकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशा या परिस्थितीचे भान ठेवून यवतमाळ जिल्हा अध्यक्ष गुड्डू भाऊ नक्षीने यांनी वनी चे आमदार यांचेकडून शासन दरबारात मागण्याचा पाठपुरावा करण्यासाठी चर्चा केली व सोबतच त्यांनी आपल्या मागण्या चे निवेदन दिले. यवतमाळ जिल्ह्यातील रेड झोन वगळता, ग्रीन झोन मधील काही तालुक्यातील सलुन दुकान काही अटी-शर्ती वर सुरू करण्यात यावा. तसेच शासनाकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा नाभिक समाजातील सलून व कारागीर यांच्या प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य पर महिना देण्यात यावा. अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष गुड्डू भाऊ नक्षीने,
यांनी केली यावेळी
सलून दुकान चालु करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
सलुन बांधव उपस्थित होते
कवडु जमदाळे, बाळु कडुकर, जितेन्द्र घुमे, आकाश हनमंते, बाळु कडुकर, अविनाश तेजे, बंटी खटले, दीवाकर नागतूरे, लक्षमन कडुकर, निबांळकर, रंजीत घुमे, बालाजी नागतूरे, निखील मांडवकर, बाळु कडुकर, निकेश कडुकर, सागर वाटेकर, गणेश मांडवकर,
समाज बांधव उपस्थित होते