भारतातील पहिले राष्ट्रीय पत्रकार संघटना, ऑल जर्नालिस्ट अँड सर्कल पत्रकार संघटना " एजेएफसी च्या राज्य संपर्क प्रमुख ' पदी तुळशीराम जांभूळकर निवड.
"भारतातील पहिले राष्ट्रीय पत्रकार संघटना, ऑल जर्नालिस्ट अँड सर्कल पत्रकार संघटना " एजेएफसी च्या
राज्य संपर्क प्रमुख ' पदी

तुळशीराम जांभूळकर निवड.

चंद्रपूर:- दिनचर्या न्युज

ऑल जर्नालिस्ट अँड सर्कल पत्रकार संघाच्या *राज्य संपर्क प्रमुख* पदी तुळशीराम जांभूळकर यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष- मा.यासीन पटेल यांच्या आदेशानुसार राज्य कोर कमिटीच्या ठरावा नुसार एकमताने करण्यात आली आहे.या नियुक्ती बद्दल
ऑल जर्नालिस्ट अँड सर्कल पत्रकार संघाच्या नवनियुक्त राज्य संपर्क प्रमुख - पदी निवड तुळशीराम जांभुळकर यांनी
राष्ट्रीय अध्यक्ष- यासीन पटेल, प्रदेशाध्यक्षा- मा.अजिंक्य गोयकर , राष्ट्रीय समन्वयक- मा.आशुभाऊ इंगळे ऑल जर्नालिस्ट अँड सर्कल पत्रकार संघाच्या कोर कमिटी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तुळशीराम जांभुळकर यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेत नियुक्तीचा ठराव केल्यामुळे राज्य कोर कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष- यासीन पटेल, विशेष आभार मानले आहे.
मूळ गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी / मोर. निवासी तुळशीराम जांभुळकर हे गेली 30 वर्षा पासून चंद्रपूर येथे राहत असून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते *इंडिया 24  न्यूज*  चे   *मुख्य संपादक* पदावर रुजू आहेत. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. , तसेच *"रितीट ग्लोबल इंडिया'* कंपनीच्या डायरेक्टर पदावर रुजू आहेत. त्यांनी आजवर अनेक क्षेत्रात कामगिरी केल्या आहेत . पत्रकारितेत त्यांना विशेष यश मिळाले आहे.ऑल जर्नालिस्ट अँड सर्कल पत्रकार संघाच्या *राज्य संपर्क प्रमुख* पदी त्यांची निवड झाल्याने इंडिया 24 न्यूज चे राज जांभूळकर - मुख्य कार्यकारी संपादक , राजेंद्र मेश्राम- कार्यकारी संपादक ,  ताराचंद नगराळे संपादक ,  खाजा सर- उपसंपादक, तेलंगणा स्टेट अँड चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी - करण कोलगुरी, उपजिल्हा प्रतिनिधी रोशन ढाकणे  , अरुण मादसवार - विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर, किरण घाटे - स्पेशल  रिपोर्टर चंद्रपुर, विशेष बल्लारपूर तालुका प्रतिनिधी- राकेश कांबळे , मयूर सोनेकर - विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर, राजेंद्र गेडाम - शहर  प्रतिनिधी चंद्रपूर, पारीश मेश्राम -बल्लारपूर तालुका प्रतिनिधी, सत्यशीला जांगडे मॅडम- ग्रामीण प्रतिनिधी  इत्यदी सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दिनचर्या न्युज