झेडपीच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपुन सुद्धा मोहमाया संपेना ! कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी तरी मुंबईतील बदली रोखण्यासाठी 'मॅट' मध्ये धाव ।



झेडपीच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचा
तीन वर्षाचा कार्यकाळ संपुन सुद्धा मोहमाया संपेना !


कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी तरी मुंबईतील बदली रोखण्यासाठी 'मॅट' मध्ये धाव ।

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :

जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुलकुमार गायकवाड यांना तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शासनाने मुंबईत बदली झाल्याचा आदेश जाहीर केला. मात्र त्या आदेशाला न जुमानता जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा अधिकारी मॅट मध्ये जाऊन बदली रोखण्याच्या प्रयत्नात असल्याचे समोर येत आहे.
जिल्हा परिषद, येथील मुख्य लेखा व वित्त अधिकारी त्यांच्या वागणुकीमुळे व कार्यपध्दतीमुळे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी व अन्य कर्मचारी यांना त्रास देत असून याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्या संदर्भात 12 डिसेंबरला आमदार सुधाकर अडबाले यांनी उपमुख्यमंत्री यांना या तक्रारीबाबत खुलासा करण्यासाठी तारांकित प्रश्न लावला होता.

मात्र आता बदलीचा आदेश डावलून चंद्रपुरातील पद टिकवून ठेवण्यासाठी या अधिकाऱ्याने पुन्हा एकदा 'मॅट' मध्ये धाव घेतली आहे. यामुळे या वादग्रस्त अधिकाऱ्याला चंद्रपूरचा मोह माया सुटेनासा झाला असल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने १२ ऑगस्टला जारी केलेल्या प्रशासकीय आदेशानुसार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुलकुमार गायकवाड यांची
जिल्हा परिषद, चंद्रपूर बदली उपसंचालक, पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई शहर या रिक्त पदावर करण्यात आली. शासनाचे अवर सचिव ता. र. पवार यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या आदेशात, गायकवाड यांनी ताकाळ नवीन पदावर रुजू व्हावे; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, आदेशाविरोधात त्यांनी 'मॅट'मध्ये धाव घेतली आहे. मागील तीन वर्षांच्या कार्यकाळात गायकवाड हे अत्यंत वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे
बदलीला स्थगिती मिळाल्याचे 'सीईओं'ना स्वतःच पत्र दिले ! १२ ऑगस्टला शासनाचा बदलीचा आदेश धडकताच गायकवाड यांनी १३ ऑगस्ट रोजी अचानक रजेवर जाऊन 'मॅट'मध्ये अर्ज दाखल केला. दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी 'मॅट'कडून स्थगिती मिळाली आहे की नाही, याची कोणतीही अधिकृत प्रत किंवा आदेश नसताना, त्यांनी स्वतःच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक पत्र देऊन माझ्या बदलीला स्थगिती मिळाली आहे, त्यामुळे मला कार्यमुक्त करू नये, अशी विनंती केल्याची विश्वसनिय सूत्राची माहिती आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना स्वतःच पत्र देऊन खुर्चीला चिकटून राहण्याच्या या प्रयत्नामुळे जि.प. प्रशासनात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लेखा विभागातील अधिकारी व कर्मचारी कमालीचे त्रस्त झाले होते. अधिकाराचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांचे वारंवार टेबल बदलविणे, महिला कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास देणे अशा अनेक गंभीर तक्रारी त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे गेल्या होत्या. यापूर्वी ९ ऑक्टोबर २०२५ मध्ये सहसंचालक लेखा व कोषागारे, नागपूर येथे त्यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली होती.
मात्र तेव्हाही त्यांनी 'मॅट'कडून स्थगिती आणून पद टिकविले होते.

खुद्द जिल्हा मुख्य लेखा व वित्त अधिकारी
अतुलकुमार गायकवाड यांनी आपल्या बदलीला 'मॅट 'कडून स्थगनादेश मिळाल्याने कार्यमुक्त करू नये, यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे विनंती अर्ज केला आहे. मात्र, स्थगनादेशासंदर्भात कोणतीही कल्पना नाही.
- नुतन सावंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जि. प. चंद्रपूर

परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील यांच्या कारभाराला कंटाळले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तरी या अधिकाऱ्याची जिल्हा परिषद मधून जाण्याची इच्छा मुळीच दिसत नसून काय गुपित दडले आहे की कुठली मोहमाया सोडू देत नाही अशी चर्चा आता जिल्हा परिषद च्या परिसरात होत आहे.