बल्लारपूर चुनाभट्टी जवळ युवक फाशी लागलेल्या अवस्थेत मिळाला !
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर असलेल्या बॉटनिक गार्डन समोरील चुनाभट्टी जवळ मुख्य मार्गावर जंगली जुळपात
एक युवक फासी लागलेल्या अवस्थेत आढळून आला.
बल्लारपूर पोलिसांनी तपासणी केली असता युवकाच्या खिशात ईलाबाद येथील तिकीट आढळून आली. अशी माहिती मिळाली. मात्र या युवकाने फासी लावली, की कुणी या ठिकाणी मारून लटकवले असा संशय उपस्थित होत आहे. पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली असून त्याचे पोस्टमार्टम झाल्यावर चौकशी अंति कारण स्पष्ट होईल.
पुढील तपास बल्लारपूर पोलीस निरीक्षक करीत आहेत.
