जातेगाव येथील माजी सैनिक खून प्रकरणातील पीडित कुटुंबाचे शंभुसेना माजी सैनिक आघाडीकडून सांत्वन

जातेगाव येथील माजी सैनिक खून प्रकरणातील पीडित कुटुंबाचे शंभुसेना माजी सैनिक आघाडीकडून सांत्वन
दिनचर्या न्युज :-

अ.नगर (प्रतिनिधी) : नगर जिल्ह्यात जातेगावमधील माजी सैनिक खून प्रकरणाला वाचा फोडत, दोषींना तात्काळ बेड्या ठोकण्याकामी पाठपुरावा करून कलम ३०२ चा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणाऱ्या शंभुसेना, माजी सैनिक आघाडीने दिनांक १७ जून २०२० रोजी मयत माजी सैनिक कै. मनोज औटी यांच्या घरी जाऊन पीडित परिवाराचे सांत्वन करून दिलासा देत धीर दिला.

सांत्वन भेटी प्रसंगी शंभुसेना, माजी सैनिक आघाडीने पीडित परिवाराला धीर देत गावातील ग्रामसंसदेला भेट दिली, तसेच लवकर न्याय मिळण्यासाठी चर्चा करून पुढील होणाऱ्या कारवाईबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, यावेळी कै.मनोज औटी यांच्या परिवाराचे मनोबल वाढविण्यासाचा प्रयत्न केला गेला. भेटी दरम्यान मा. गृहमंत्री, मा.सैनिक कल्याण मंत्री व मा. विरोधी पक्षनेते यांच्या वतीने सांत्वना संदेश पीडित परिवारापर्यंत पोहचविण्यात आला. पुढील कोणत्याही मदतीसाठी सर्व शंभुसेना व माजी सैनिक कै.औटी परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा दिलासा शंभुसेना प्रमुख, माजी सैनिक व ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज मा. दिपक राजेशिर्के यांनी पीडित औटी कुटुंबाला दिला. यावेळी परिवारातील सदस्यांनी तसेच त्यांच्या हितचिंतकांनी शंभुसेना, माजी सैनिक आघाडी मार्फत होत असलेल्या मदती व कारवाईबाबत आभार व्यक्त केले.

सांत्वन भेटी प्रसंगी शंभुसेना संघटना प्रमुख मा.दिपकजी राजेशिर्के, जेष्ठ माजी सैनिक व राष्ट्ररत्न पुरस्कार विजेते बी.व्ही.जाधव, माजी सैनिक आघाडीचे सुनिल काळे, आनंद ठाकूर, अजितराव निबांळकर, श्री. बाबासाहेब जाधव, रमेश गायके, सुरेश पडवळ, गोविंद कांगणे, एस. बी. गावडे, शेळके, तुकाराम डफळ, संजय शेळके, प्रदीप इथापे, चंद्रकांत तळेकर, सचिन हडोळे पाटील, विठ्ठलराव होनमाणे पाटील, विलास केसरे, हर्षल शिर्के, संजय नाळे, चंद्रकांत वाबळे, नरसाळे साहेब, प्रवीण येवले, एम. ए. बिराजदार, सुरेश रणशिंग साहेब, आनंदा जाधव, अनिरुद्ध शिंदे, पांडुरंग काळे आदीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे शंभुसेना माजी सैनिक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.