सलून दुकानदारवर शारीरिक अंतराचे पालन न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

चौथ्या लॉकडाऊनमध्ये सर्व दुकानांना सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. परंतु, ग्राहकाच्या जवळ जावून काम करावे लागत असल्याने सलून दुकानात कोरोना संसर्गाचा जास्त धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सलून दुकानांसाठी कडक नियमावली केली आहे.

example

सलुन दुकानदाराव शारीरिक अंतराचे पालन न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दिनचर्या न्युज

सातारा : शारिरीक अंतराचे पालन न केल्याप्रकरणी राजवाडा परिसरातील एका सलून दुकाना मालकांवर शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशोक रामचंद्र सूर्यवंशी (रा. केसरकर पेठ, सातारा), पांडूरंग शिवाजी दळवी (रा. जकातवाडी,ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत.

जिल्हा प्रशासनाने सध्या जिल्ह्यातील सर्वप्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये सलून दुकानांचाही समावेश आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनाच नियमांचे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यातही खासकरून सलून दुकानदार व ब्यूटी पार्लर व्यावसायीकांसाठी विशेष नियमावली जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केली आहे. सलून धारकांनी सुरक्षा किट, मास्क वापरूण सेवा देण्याचे त्यात म्हटले आहे.

परंतु, गोलबाग परिसरात गस्त घालत असताना जाधव हेअर ड्रेसर या दुकानात मालक व कामगार कोणताही खबरदारीची उपाय योजना नकरता लोकांची केस कापत होता. हा प्रकार या परिसरात पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हवालदार राहूल चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.


दिनचर्या न्युज