महानगरपालिकेच्या कचरा कुंड्या गेल्या कुठल्या कचऱ्यात ?





*महानगरपालिकेच्या कचरा कुंड्या गेल्या कुठल्या कचऱ्यात ?
चंद्रपूर वि.प्र :-

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सक्रिय सहभाग नोंदविला खरा परंतु त्यावर नियोजनाचा अभाव नाही वाटत बरा.असं म्हणावं लागेल .कारण चंद्रपूर शहरात महानगरपालिका द्वारे जे पण नियोजन दिसून येते ते एक ना धड भाराभर चिंध्याच चिंध्या सारखा ताल आहे . असं नसतं तर लाखों रुपयाचा खर्च करून शहरभर स्टीलच्या कचरा कुंड्या लावल्या, प्रत्येक वार्डात लोखंडी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या त्या आज एखाद्या ठिकाणी सोडली तर दिसेनाशी झाली .म्हणजे काय त्या कचरा कुंड्या चोरीला गेल्या म्हणावं ? तर मग हा किती गहन प्रश्न झाला की जिथं लोकांची दिवस रात्र रहदारी राहते , पोलिस चोवीस तास सजग असतात .त्या परिसरातील कचरा कुंडया गेल्या तरी कशा ?
गाँधी चौक ते बस स्टँड घ्या किंवा पाणी टाकी ते गिरनार चौक घ्या ह्या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा कचरा कुंडी लावण्यात आल्या होत्या .अगदी जसे या आधी मोठमोठे झाडं लावण्यात आले होते .पण त्यांना महानगरपालिका टिकवू शकली नाही . त्त्या झाडांची किमत लाखोंचा घरात असताना व्यर्थ गेले. अशाच प्रकारे ह्या कचरा कुंड्या गायब होत आहे .
म्हणजे कुणीतरी सूचना करायची व तसं संगनमत करून कंत्राट काढायचा आणी मग धनादेश प्रक्रिया संपली की कुणाला काही देणं घेणं नाही .
'अरे व्हा रे व्हा' अजब गजब ताल आहे .हा सर्व प्रकार पहाता ज्या कचरा कुंड्या महानगर पालिका प्रशासनाने किती खरीदी केल्या, आणी आजच्या घडीला त्या कुठे ठेवल्या यां बाबतीत चंद्रपूर शहरात चर्चेचा विषय ठरला आहे .यासाठी निश्चित चंद्रपूर शहर महानगरपालिकेला अजब गजब महानगरपालिका अशी उपाधी दिलीच पाहिजे असे म्हणने वावगे ठरणार नाही.