महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतिने सुशांत नक्षिणे या कोरोना योद्धाचा सन्मान



महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतिने सुशांत नक्षिणे या कोरोना योद्धाचा  सन्मान

चंद्रपूर :-
दिनचर्या न्युज :-
महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने नाभिक समाजातील आपले एक सामाजिक दायित्व समजून समाजातील गोरगरीब गरजवंतांना कोरोनाव्हायरसच्या काळात मदतीचा हात पुढे करणारे, पॅथॉलॉजी व मेडिकलचे संचालक सुशांत देवानंद नक्षीने यांनी कोरोनाचा संकटात मदतीचा सहारा देऊन स्वतः धान्य किराणा किट, सलून बांधवांना सेफ्टी किट, घरपोच देऊन मदत केली. लाँकडाऊनच्या काळातील अनुभव कथन करताना म्हणाले की, ' समाजातील कोणताही माणूस हा वाईट नसतो, तर ती परिस्थिती माणसाला वाईट बनवते'.
अनेकांच्या चुली पेटताना जो आनंद मिळतो होता. तो शब्दात ते सांगता येत नाही, मी काही फार मोठे काम केले नाही. समाजाप्रती कृतज्ञता आणि मी समाजातील एक घटक म्हणून माझ्याकडून हे समाजाला काहीतरी देणे म्हणून मी माझे कर्तव्य केले.
या छोटेखानी सत्कार समारंभ माझा आपण महाराष्ट्र नाभिक महामंडळ कडून सत्कार केला त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर यांच्या नेतृत्वात, या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर लोकमत नागपुर हे होते. म्हणाले की, सुशांतभाऊ तुमच्या या कार्याची परतफेड सत्काराने होणार नाही. पण समाजाचे दायित्व म्हणून हा समाजाचा एक सन्मान श्री संत नगाजी महाराज , श्री संत सेना महाराज, शाल श्रीफळ
आपण स्वीकारला. यापुढे आपण असेच कार्य करत राहावे ही सदिच्छा!
 ज्येष्ठ समाजसेवक वसंतराव बडवाईक यांच्या हस्ते,   मार्गदर्शक दत्तू भाऊ कडूकर,  बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष  श्यामभाऊ राजूरकर,  नाभिक महामंडळ जिल्हा कार्याध्यक्ष माणिकचंद चन्ने,  शहराध्यक्ष संदेश चल्लीरवार,  प्रेम ज्योती नाभिक महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सौ.  सरोजताई चांदेकर,  यांच्या हस्ते श्री संत नगाजी महाराज,  श्री संत सेना महाराज,  यांची प्रतिमा,  शाल ,  श्रीफळ,  पुष्पगुच्छ देऊन कोरोना योद्धा, सुशांत देवानंद नक्षिणे  त्यांच्या पत्नी सौ.  जयश्री सुशांत नक्षीने, वडील श्री देवानंद नक्षिणे, आई सौ. वनिता देवानंद नक्षिणे यांनाही गौरवण्यात आले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी समाजाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

दिनचर्या न्युज