सिद्धबल्ली कंपनीत कामगाराच्या मृत्यूची चौकशी करावी!




सिद्धबल्ली कंपनीत कामगाराच्या मृत्यूची चौकशी करावी,!

व्यवस्थापक, मॅनेजर व सेक्युरिटी यांच्या हलगर्जीपणामुळेच कामगारांची पिळवणूक!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर एमआयडीसी मधील सिध्दबल्ली इस्पात लिमिटेड कंपनीत नुकताच एका भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोन कामगार हे अतिशय जखमी झाले आहे. ही कंपनी एमआयडीसी परिसरात अनेक वर्षापासून कार्यरत होती, काही वर्षा पासून कंपनी पूर्णपणे बंद अवस्थेत होती. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच पुन्हा काम सुरू केले असून मी मिंटेनेस करताना हा अपघात झाला. असल्याचेही चर्चा आहे. या कंपनी मधील जुनी सर्व मशिनरी जीर्णावस्थेत असून या जीर्ण मशीन मुळेच हा अपघात झाला असल्याचे चौकशी अंती दिसून येते. मात्र या अपघातामध्ये मृतक अनेक गंभीर जखमी झालेल्या कामगारांना कंपनीने अजूनही न्याय दिला नाही.
 नुकतेच दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी किसान काँग्रेस चंद्रपूर जिल्हा कमिटीच्या वतीने  पालकमंत्री व राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय विजयभाऊ  वडेट्टीवार यांना निवेदन देऊन या अपघातात मुत्यु व जखमी झालेल्या कामगारांना न्याय देण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.  कामगारांना मिलिमम वेजेस प्रमाणे  वेतन देण्यात येत नाही.   त्यावर सुद्धा निर्णय  व्हावा,  भविष्य निर्वाह निधी   सुट्ट्या कापण्यात याव्या व   नियमाप्रमाणे पगार सुद्धा कंपन्यांनी द्यावे,  शासन नियमाप्रमाणे  शासकीय सुविधा देण्यात यावी,

 व्यवस्थापक मॅनेजर व सेक्युरिटी  यांच्या  हलगर्जीपणा मुळे कामगारावर  अन्याय! 




 सिद्धबल्ली कंपनीत  व्यवस्थापक ,मॅनेजर व सिक्युरिटी यांच्या  हलगर्जीपणा मुळे हा अपघात झाला असल्याचे कामगारात बोलल्या जात आहे.  कंपनीत अनेक कामगारांना सेफ्टी किट नसल्याने  आपल्या जीवावर उदार होऊन कामगारांना काम  करावे लागत आहे.  संबंधित घटनेची माहिती घेण्यासाठी वर्तमानपत्रातील पत्रकार कंपनीत गेले असता. याबाबतची माहिती देण्यास कंपनीच्या मॅनेजर नी चक्क नकार दिला.  व  कंपनीतील गेटवरील सेक्युरिटी ना पत्रकारांना आत न  जाऊ देण्याचे  सांगण्यात आले .   मुजोर सेक्युरिटी यांनी पत्रकाराच्या धसक्याने  चक्क मेन गेटला कुलूप लावून घेतले.  हा प्रकार सोबत असलेल्या सर्व पत्रकारांनी बघितला.  यावरून असे लक्षात आले की,  या कंपनीत कामगाराच्या जीवावर खेळून,  अनेक प्रकारचा सावळागोंधळ या कंपनीत चालत असतो हे सिद्ध होते.  मोठ्या प्रमाणात कंपनीत कामगारांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास येते.  या कंपनीत झालेल्या घटनेची चौकशी करण्यात यावी कंपनी मालकावर सदोष  मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी  किसान काँग्रेस चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.