भिवापूर हनुमान मंदिर येथे ओबीसीची बैठक संपन्न!






भिवापूर हनुमान मंदिर येथे ओबीसीची बैठक संपन्न!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- संविधान दिनी 26 नोव्हेंबर 2020 ला होणाऱ्या ओबीसीच्या विशाल मोर्चा संदर्भात आज भिवापुर हनुमान मंदिर येथे गुरुदेव सेवा मंडळ चंद्रपूर , जिल्हा सेवा अधिकारी, ओबीसी जनगणना समन्वय समितीचे सदस्य एडवोकेट दत्ताभाऊ हजारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी भिवापूर वार्डच्या नगरसेविका मंगलाताई आखरे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष दिनेश एकवनकर, माजी नगरसेवक तथा गुरुदेव सेवा मंडळाचे राजूभाऊ आखरे, दादाची नंदनवार ग्रामगीताचार्य, वासुदेवजी डाखोरे, यासह गुरुदेव सेवा मंडळाच्या महिला मंडळ यांची उपस्थिती होती.
 दत्ताभाऊ हजारे म्हणाले की,  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी  दिलेल्या ओबीसी न्याय हक्कासाठी,  भविष्यात आपल्या मुलाबाळांवर होणाऱ्या अन्यायासाठी चंद्रपूर जिल्ह्यात संविधान दिनी 26 नोव्हेंबर 2020 ला सकाळी 11 वाजता लाखोच्या संख्येने मोर्चात सहभागी   होण्याचे आवाहन केले.
 देशात 1931 मध्ये ओबीसीची जातीय टक्केवारी 57 टक्के होती.  मात्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज देशात पशुपक्ष्यांची गणना केली जाते मात्र या सरकारकडून ओबीसी बांधवाची  जातिनिहाय जनगणना केली जात नाही. हे आपले दुर्दैव आहे. यासाठी लाखोच्या संख्येने  सर्व जातीतील ओबीसी समाज बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे,  अशी माहिती बैठकीत देण्यात आली.