जिल्हात २४ तासात 164 कोरोना बाधित,
84 कोरोनामुक्त , दोन मृत्यू
आतापर्यंत 23,749 जणांची कोरोनावर मात
ॲक्टीव पॉझिटिव्ह 973
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 17 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 84 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 164 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार 128 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 749 झाली आहे. सध्या 973 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 37 हजार 821 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख नऊ हजार 905 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये सुरक्षानगर, भद्रावती येथील 62 वर्षीय महिला व नांदफाटा, कोरपना येथील 70 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 406 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 367, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 164 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 88, चंद्रपूर तालुका 14, बल्लारपूर दोन, भद्रावती 17, ब्रम्हपुरी दोन, नागभिड चार, सिंदेवाही तीन, मूल दोन, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी एक, राजुरा एक, चिमूर चार, वरोरा 21, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.