या आगारात डिझेल नसल्याने अडकल्या लालपरी !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
सर्व सामान्यांची जिवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी ब्रम्हपुरी आगारातील लाल परि इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने थांबली. यामुळे अनेक प्रवासाची चांगलीच फजिती झाली. अनेक बसस्थानकावर प्रवासाना तातकाळत राहावे लागले.
ब्रह्मपुरी डेपोच्या हलगर्जीपणामुळे, तसेच बस व्यवस्थापकाच्या दुर्लक्षित पणामुळे आगारातील इंधन संपेपर्यंत जर लक्षात येत नसेल तर, मग येणार इंधनाचा आणि खर्च झालेल्या इंधनाचा गोषवारा कुठे जात तर नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर पडला आहे.
अगदी समोर होळीचा सण साजरा करण्यासाठी अनेक नागरिक आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले असता मात्र ब्रम्हपुरी आगारातील इंधन तुटवडा निर्माण झाल्याने बसने प्रवास करणाऱ्यांची चांगलीच गोची झाली असल्याने प्रवाशी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे.