अखेर ईश्वरचा बळी घेणारा वाघ जेरबंद !




अखेर ईश्वरचा बळी घेणारा वाघ जेरबंद !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :चिमुर
चिमूर क्षेत्रात येत असलेल्या भिशी -शंकरपूर आंबोली असोला असलेल्या शेतशिवारात शंकरपूर येथील ईश्वर भरडे याला वाघाने हल्ला करून ठार केले होते.
त्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी गावातील परिसरातील नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले होते. त्यासाठी वन विभागाने चारही बाजूने वाघाला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी दिवस-रात्र परिश्रम करीत होते. आज सायंकाळी त्या नरभक्ष वाघाला पकडण्यात वन विभागाला यश आले. वाघाला जेरबंद केल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
मात्र अजूनही या परिसरात काही वाघाची दहशत कायम असून वन विभाग परिसरात लागून असलेल्या शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन शेताच्या कामावर जावं लागत आहे.
वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात त्या नरभक्ष वाघाला जेर बंद करण्यात आले आहे.