जनता लॉन्चरच्या व्यवस्थापनाला कंटाळून 17 वर्षीय मुलाची आत्महत्या
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
1) फिर्यादी नामे गुलाब विठुजी सुदरी वय ४४ वर्षे जात कुणबी धंदा शेती राह धानोरा (पिपरी) ता. जिल्हा चंद्रपूर
2) मयत नागे- बालक वय १७ वर्ष जात कुणबी धंदा शेती राह धानोरा (पिपरी) ता. जिल्हा चंद्रपूर
3) घटनास्थळ- जनता लॉन्चर रामनगर चंद्रपुर
4) घटना ता वेळ दिनांक २०/११/२५ चे सकाळी ०७/३० वा ते ०९/०० वा.
आज दिनांक २०/११/२५ चे सकाळी ०७/३० वा ते ०९/०० वा. वय १७ वर्षे बालकाने यांने जनता लॉन्चर येथील वरच्या मजल्यावर राहत असलेल्या ठिकाणी नायलोन दोरीन पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या केली अशी माहीती मिळाल्याने रामनगर पोलीस घटणास्थळी पोहचुन घटनास्थळ पंचनामा केला. त्यानंतर पोलीस स्टेशन रामनगर येथे मयत मुलाचा वडील फिर्यादी नामे नांव : गुलाब विठुजी सुदरी वय ४४ वर्षे जात कुणबी धंदा शेती राह धानोरा (पिपरी) ता. जिल्हा चंद्रपूर यानी तोंडी रीपोर्ट दिली की, मयत बालक वय १७ वर्षे याने फिर्यादीस सागीतले की होस्टेलचे वार्ड बॉय व व्यवस्थापनामधील कर्मचारी त्यांना मानसिक त्रास देत आहे. त्याची मनस्थिती बरोबर वाटत नाही परंतु त्याला आम्ही समजावुन सांगीतले की, तु व्यवस्थीत राहा आम्ही त्याच्या त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. अशी रीपोर्ट दिल्याने आरोपी नामे १) लक्ष्मन रमाजी चौधरी (वार्डन) २) प्रेमा झोटींग (व्यवस्थापक) ३) विष्णुदास शरद ठाकरे (सल्लागार) ४) आशिष किष्णाजी महातले (प्राचार्य) यांच्या विरुध्द कलम 107,3(5) भान्यास अन्वये गुन्हा नोंद करून सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधिक्षक श्री मुम्मका सुदर्शन, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री इश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद चौगुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस करीता आहे.
