स्थानिक गुन्हे शाखाने आंतरराज्यीय चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या!



स्थानिक गुन्हे शाखाने आंतरराज्यीय चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या!

आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा टेंभुरडा येते अज्ञात चोरट्यांनी मागील खिडकी गॅस कटरने कापून बँकेत ठेवलेले नगदी 6,88,130 व 93. 100 ग्रॅम वजनाचे दागिने असा एकूण 11, 35010 रुपयाचा माल चोरून नेला . अशी तक्रार पोलीस स्टेशन वरोरा येथे करण्यात आली होती. त्यात अपक 249/2021 कलम 457.,380 भा. द. वी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
वेगवेगळ्या गुन्हातील साहित्यासह एक करोड सात लाख चौतीस हजार तिनशे रूपयांचा माल जप्त केला आहे. 
 सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे ला प्राप्त होताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहा पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पो.उप नि.  संदीप कापडे,   त्यांनी लगेच आपली सूत्र फिरवीत तपास सुरू केला. 
 याच गुन्ह्याप्रमाणे सण 2013 मोजा माढळी  असाच गुन्हा घडला होता.  एक महिना अगोदर अशाच प्रकारचा दरोडा भंडारा,  गोंदिया या जिल्ह्यातील देखील घडला होता.  तसेच तेलंगणा राज्यातील असे गुन्हे घडल्याची नोंद झाली होती.  सदर गुन्ह्यात एकसारखे प्रकार लक्षात येताच स्थानिक गुन्हे शाखेने प्रथम   गोंदिया जिल्ह्यातील  गिरोला  हेटी या गावातून देविदास रूपचंद कापगते,   राजू वसंत वरबे,  व संकेत तेजराम उके  चंद्रपूर जिल्ह्यातून पडोली येथून ताब्यात घेण्यात आले.  त्यांच्याकडून सखोल चौकशी केली असता.  सदर गुन्हा उत्तर प्रदेश राज्यातील ककराला   गॅंग मधील  सहा इस्मा सह मिळून सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. 
सदर तपास पथकाला दि. 31/03/2021 यातील मुख्य आरोपी नवाबउल हसन हा हस साथीदार दानवीर उर्फ गॅसटु याला भेटण्याकरीता येणार आहे अशी माहीती प्राप्त झाली त्यावरून आसपुर ते आलापुर मार्गावर वेगवेगळ्या चार ठिकाणी चार पथके तयार करून त्यांना आरोपी गोषणीय पाळत ठेवण्यात आली. त्यावेळी एका पथकाला माहीती प्राप्त झाली की, यातील मुख्य आ हसन हा त्याचा साथीदार नामे दानविर उर्फ गॅसटु सह हसनपुर ते आलापुर मार्गावरील शेताजवळ त्यावरून सर्व पथकांना याबाबत माहीती देवुन स.पो.नि. जितेन्द्र बोबडे व पो.उप.नि. संदीप कापडे अविनाश दशमवार व एस ओ जी बदायुचे पो.शि. मनोज यांचे सह दोन्ही आरोपींना पकडण्याकरीत दोन्ही आरोपींनी त्यास प्रतीकार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यात झालेल्या झटापटीमध्ये स.पो.नि. यांचे हाताला जबर दुखापत झाली तसेच प्रो.उप.नि. संदीप कापडे यांचे हाताला सुदधा किरकोळ र लागला. तरी देखील सदर अधिकारी यांनी खचून न जाता सोबत असलेल्या स्टाफचे मदतीने योग्य करून सदर दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
त्यानंतर वरील ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना स्थानिक आलापुर पोलीस ठाणे जिल्ह नेवुन त्यांना सदर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली. त्यांचे कडे अधिक तपास करणे क न्यायालयाकडुन ट्रान्झीस्ट रिमांड घेवुन तपास करण्यात आला. त्यांचे कडे सखोल चौकशी केली गुन्हा ककराला उत्तर प्रदेश येथील 06, चंद्रपुर जिल्हयातील 02 व गोंदीया जिल्हयातील  अनेक आरोपींनी मिळुन गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांचे कबुलीप्रमाणे मुख्य आरोपी नामे नवाबुल हसन् झडती घेतली असता त्याचे घरातुन 120 प्रकारचे पिवळया धातुचे 2 किला 800 ग्रॅम वजनाचे वेग मिळून आले. तसेच ईतर आरोपींचा शोध घेतला असता त्यांना मुख्य आरोपी पकडल्या गेल्याची जिल्हयात पसरल्याने ककराला गावातील सगळे आरोपी गाव सोडुन पळुन गेले. यातील दोन्ही सदर आरापींना वरोरा न्यायालयासमोर हजर करून दि. 08/04/2021 पावेतो पोलीस कोठडी
रिमांड घेण्यात आले आहे. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्यांनी टेंमुर्डा जिल्हा चंद्रपुर येथील महाराष्ट्र बँकेतील गुन्हा व त्याच बँकेत सन 2019 साली केलेला एक गुन्हा तसेच भंडारा जिल्हयात 05, गोंदीया जिल्हयात 03, व तेलंगाणा राज्यात 01 असे एकुण 11 गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. सदर आरोपींकडे अधिक तपास करून सदर गुन्हयातील चोरलेली मालमत्ता हस्तगत करण्यात येत. आहे. तसेच या व्यतीरीक्त आणखी काही महाराष्ट्र व ईतर राज्यात काही गुन्हे केल आहेत काय? याबाबत तपास करण्यात येत आहे. तसेच त्यांचे ईतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री अरवींद साळवे, अपर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत खैरे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली स्थानिक गर्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाड़े, स.पो.नि जितेन्द्र बोबड़े, पो.उप नि. संदीप कापडे, स.फौ. नितीन जाधव, पो.हवा. महेन्द्र भुजाडे, ना.पो.शि. अविना दशमवार, अनुप डांगे, पो.शि. सतिश बगमारे, प्रफुल मेश्राम, कुंदन बावरी, अमोल धंदरे, प्रशांत नागोर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी केली असुन तांत्रीक विष्लेशणाकरीता सायबर पोलीस स्टेशनचे प्रभा
अधिकारी निशीकांत रामटेके, ना.पो.शि. मुजावर अली, प्रशांत लारोकर, पो.शि. छगन जांभुळे,ईमरानशेख,गजानन नागरे यांनी केली आहे.