बंटी भांगडीया यांनी घेतली वसंत देशमुख यांची सदिच्छा भेट

बंटी भांगडीया यांनी घेतली वसंत देशमुख यांची सदिच्छा भेट

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-

चंद्रपूर महानगर पालिका सभापति पदामुळे दावेदार असलेल्या वसंत देशमुख यांच्या सोबत चंद्रपुरातील स्थानिक पातळीवर जे गलिच्छ राजकारण करण्यात आले. त्याची सर्व स्तरावरून निंदा होत असल्याने एकीकडे भाजप पक्षात नाराजीमुळे गटबाजी निर्माण झाली. तर विरोधी पक्षाना वसंत देशमुख यांची किंमत लक्षात घेता आपल्या पक्षात ओढण्याची नामी संधी मिळाली .म्हणून गेल्या काही दिवसा आधी रामु तिवारी सारखे काँग्रेसचे जिल्हाध्क्ष वसंत देशमुख यांची भेट घेताना दिसले. तर इतर ही पक्ष वसंत देशमुख यांच्या संपर्कात दिसून येत आहे.
भाजप पक्षाद्वारे या ना त्या प्रकारे वसंत देशमुख यांची मनधरणी चालूच ठेवलेली आहे. पण वसंत देशमुख पक्षाच्या कुठल्याही नेत्याला जुमानत नसल्यानें भाजप पक्ष वसंत देशमुख यांची मनधरणी करण्यासाठी आणखी कुठला कुठला पावित्रा अमलात आणतात हे अंदाज लावता येणे कठीणच .
परंतु आज दिनांक 21/03/3021 रोजी सोमवारला अचानक बंटी भांगडिया आमदार चिमूर विधानसभा हे वसंत देशमुख यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतात. याचा अर्थ येणारी महानगर पालिकेची निवडणुक ही अत्यंत चुरशीची तर होणारच शिवाय वसंत देशमुख हा असा चेहरा असेल की जो महानगर पालिकेत सत्ता स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. वसंत देशमुख सारखा उत्तम संघटन कौशल्य असलेल्या व्यक्तीला डावलून दुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या व्यक्तीला संधी लाभते हे जनतेला पचनी पडणारे नसून जनता वसंत देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी दिसत आहे.
म्हणून म्हणावं लागेल व बघण्यासारखं असेल की, वसंत कसा बहरेल व येणारी निवडणुक कुठला पक्ष जिंकेल?