अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल (मुद्दा) यांनी पदभार स्वीकारला
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, ता. २३ : चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल (मुद्दा) यांनी आपल्या पदाचा पदभार बुधवारी, (ता. २३) स्वीकारला. यापूर्वी ते वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते.
विपीन पालीवाल (मुद्दा) यांनी आतापर्यंत कामठी, बल्लारपूर आणि वर्धा नगर परिषद येथे कार्यरत होते. बल्लारपूर नगर परिषदेत जवळपास ५ वर्ष मुख्याधिकारीपदी होते. येथे त्यांनी लोकसहभागातून अनेक उपक्रम राबविले. "स्वच्छ बल्लारपूर, सुंदर बल्लारपूर" संकल्पना राबवून राज्यस्तरावर पारितोषिक मिळाले होते. बल्लारपूर शहराला केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने थ्री स्टार दर्जा (कचरा मुक्त शहर) देण्यात आला होता.
मागील 10 महिन्यांपूर्वी विपीन पालीवाल (मुद्दा) यांनी वर्धेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. यांच्या कार्यकाळात वर्धा शहरात अनेक विकासात्मक कामे झाली. ज्यात वर्धा नगर परिषदेची प्रशस्त इमारत निर्माण, जनतेच्या सहकार्यातून स्वच्छ व सुंदर वर्धा निर्माण करण्यास प्राधान्य दिले. आता पदोन्नतीवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज पहिल्या दिवशी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात सर्वसाधारण सभेत उपस्थित राहून सभागृहाला परिचय दिला. चंद्रपूरची स्वच्छ शहर म्हणून ओळख आहे. ती अधिक चांगला करण्याचा प्रयत्न करेन. माझी वसुंधरा हा उपक्रम लोकसहभागातून राबवू. सध्या कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरणावर भर देऊ, असे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल (मुद्दा) यांनी सांगितले.
दिनचर्या न्युज