देशीदारू, बार विक्रेत्याकडून अतिरिक्त दराने ग्राहकांची लूट !





देशीदारू, बार विक्रेत्याकडून अतिरिक्त दराने ग्राहकांची लूट !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर शासनाने नियम लागू केली आहेत.
परवाना धारकांना शासनाने दारू विक्री सकाळी ७ ते सायं. ४ पर्यंत करण्याचे शासनाचे आदेश असताना. मात्र दारू विक्रेते निमाला पायदळी तुडवत सरास
दुकाने चालू ठेवून आतिल मार्गाने दारूची विक्री करण्यात येत आहे.
 दारूचा एम .आर. पी .च्या अतिरिक्त दराने ग्राहकाची दारू विक्री करून लूट होत असल्याचे पाहावयास मिळते आहे. बार मध्ये 270 च्या वर तर देशी दारू 70 रू. विकल्या जात असल्याचे मधशौकीनात तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. 
जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हापासून तर आजही जर, याच दराने विक्री होत असेल तर, मग दारूबंदीत आणि आता सुरू होवून काय फायदा? अशा दारू पिणा-यात आक्रोश निर्माण होत आहे. 
 अनेक ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागल्याची माहिती आहे. गर्दी चा फायदा घेत काही परमिट धारकांनी जादा दरात दारू ची विक्री केल्याचा आरोप मद्यपी करीत आहेत. विविध बँड च्या दारूचे दर बार किंवा शॉप च्या दर्शनी भागात लावण्यात यायला हवे अशी मागणी ही काही मद्यपींनी केली आहे. जिल्ह्यात 5 तारखेपासून सुरू झालेल्या दारू विक्रीचे पडसाद जिल्ह्यात उमटत असून गर्दी तथा मद्यपींचे अनेक व्हिडीओ सोशल माध्यमांवर फिरत आहेत.
उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार  बारवाल्याना दारू हि परमिट धारकांना विकायची आहे. असे नियम असताना. जिल्ह्यात सर्रास खुल्या मार्गाने दारू विक्री सुरू आहे .जिल्ह्यात सध्या किती परमिट धारकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाने परमिट दिले आहे. याची चौकशी करून. जिल्ह्यात दारू विक्री सुरू झाली.  किती परमिट धारकांना दारू विकण्यात आली. याचिही  नोंद ही बार मालकाकडून उत्पादन शुल्क विभागाने घेणे अपेक्षित आहे. 
दारूबंदीच्या सहा वर्षानंतर दारू जिल्ह्यात सूरू झाली. असली तरी बार मालकाकडून मधपिणा-याची लुट होवू नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देऊन अतिरिक्त दारू विकणा-या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 
.