विकास जुमनाके यांची उपसभापती पदी निवड
विकास जुमनाके यांची उपसभापती पदी निवड

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

चंद्रपूर पंचायत समितीच्या आज झालेल्या उपसभापती पदी विकास जुमनाके यांची निवड करण्यात आली. घुग्घुस नगरपंचायत निर्माण झाली तेव्हापासून आजपर्यंत हे पद रिक्त होते, या अगोदर उपसभापती निरिक्षण तांड्डा हे होते. त्याचे सदस्य रद्द झाले होते.
चंद्रपूर पंचायत समिती ताडाळी क्षेत्रातून भारतीय जनता पक्षातर्फे विकास जुमनाके निवडून आले होते. आता त्यांना सहा महिण्यापर्यंत उपसभापती रहाण्याचा बहुमान मिळाला आहे.
उपसभापती पदावर राहुन जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा जनतेच्या कल्याणासाठी करीन असे मत व्यक्त केले.
या निवडीबद्दल सभापती खेमा रायपुरे , पंचायत समिती सदस्य यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

दिनचर्या न्युज

.