सेंट मायकेल शाळेच्या मनमानी कारभाराविरुद्ध पालकांचा एल्गार





सेंट मायकेल शाळेच्या मनमानी कारभाराविरुद्ध पालकांचा एल्गार


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
रामनगर, चंद्रपूर येथील सेंट मायकेल इंग्लिश स्कूल (सी.बी.एस.ई.) मध्ये शाळा प्रशासनाने दिनांक ०२ जून रोजी २.३० मिनिटांनी पालक-शिक्षक संघाच्या सदस्याची स्वतःच्या मर्जीने निवड करून त्यांची नावे जाहीर केली. परंतु, याविषयी कोणतीही पूर्वकल्पना पालकांना देण्यात आली नसल्याने, पालकांनी याविषयी शाळा प्रशासनाकडे विरोध नोंदवून अश्या प्रकारे पालक प्रतिनिधींची निवड करणे म्हणजे *महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क (शुल्क विनियमन) अधिनियम २०११* चे उल्लंघन असून, पालक-शिक्षक संघाच्या सदस्यांची निवड करणे हा फार महत्त्वाचा विषय असून पालकांच्या समस्या समजून त्याचे योग्य प्रतिनिधित्व करू शकतील असे सदस्य निवडण्यात यावे असा पालकांनी आग्रह केला. पण शाळा प्रशासनाने याची दखल न घेता पालकांची मागणी हिटलरशाहीपणे धुडकावून लावली
त्यामुळे पालकांनी शाळा प्रशासनाने स्वमर्जीने निवडलेल्या प्रतिनिधींची निवड रद्द करून पुन्हा एकदा पालकांना त्यांचे योग्य प्रतिनिधी निवडण्याची संधी देण्यात यावी, असे निवेदन घेऊन *पेस (पॅरेंट्स असोसिएशन फॉर चिल्ड्रन एजुकेशन)* या संस्थेकडे धाव घेतली. यासंदर्भात पेस संस्थेचे सदस्य आणि शाळेतील पालक दि. ०७
जुलै रोजी शिक्षणाधिकारी श्री. उल्हास नरड (माध्य.) व श्री. दिपेश लोखंडे (प्राथ.) यांची भेट
घेऊन, या यासंदर्भात लक्ष घालून पालकांना योग्य न्याय द्यावा अन्यथा पालकांतर्फे सर्वव्यापी आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना श्री.ओमप्रकाश यंगलवार,श्रीकांत पवार, राजूभाऊ तांबोळी,दिनेश जुमडे,
सचिन पेटकर, वाकडीकर, कुरेशी,कारवटकर, मोहर्ले,बोराडकर, नंदूरकर, पारखी, खंदारे, श्रीमती रिता खडसे, कोडापे, वैशाली कांबळे, रुपाली चालखुरे, स्मिता रासमलवार व शाळेतील बहुसंख्य पालक यांची उपस्थिती होती.

दिनचर्या न्युज