आदिवासीच्या जमीनी बेकायदेशिररित्या कंपन्यांच्या घशात, उचित कार्यवाही न झाल्यास बिरसा ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा!

आदिवासीच्या जमीनी बेकायदेशिररित्या कंपन्यांच्या घशात, उचित कार्यवाही न झाल्यास बिरसा ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा!

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
आदिवासीच्या जमीनी बेकायदेशिररित्या कंपन्यांच्या घशात, उचित कार्यवाही न झाल्यास बिरसा ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा आज पत्रकार परिषदेतून दिला.
यात श्री. प्रशांत सुभाष बेडसे पाटील तत्कालीन तहसिलदार जिवती यांनी नियमबाह्य व बेकायदेशिर, वरिष्ठ अधिकारी यांना अंधारात ठेऊन कोणतेही आदेश व निर्देश वरिष्ठांचे नसतांना, मोजा कुसुंबी तालूका जिवती जिल्हा चंद्रपूर हा संपूर्ण गावठाण सह 24 आदिवासींच्या शेतजमीनी 63, 62 हे. आर. अर्थात 150 एकर जमीनीचा ताबा अल्ट्राटेक सिमेंट कंपनीला दिला आहे. जे काम 37 वर्षात शासन, प्रशासन करु शकली नाही, कारण 7/12 वर मालकी हक्क आदिवासीचांच होता व आहे, ते काम नियमबाह्य व बेकायदेशिर या प्रशांत बेडसे पाटील यांनी स्वतःच पत्र तलाठीला देऊन, स्वतःच फेरफार क्रमांक 248 मंजूर केले आहे. मात्र त्या फेरफार मध्ये आदेश/पत्राचा दिनांक नाही, महिना नाही, वर्ष नाही, कोटांचा आदेशही नाही, ताबाही लिहला नाही, असे असतांना या बिन डोक तत्कालीन तहसिलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी तो फेरफार मंजूर केलाच कसा असा प्रश्न निर्माण होतो.
जो अधिकारी आदिवासी कुसुंबी गावठान व 24 आदिवासींच्या जमीनीचा ताबा स्वतःच्या स्वार्थासाठी व आर्थिक लाभासाठी बेकायदेशिररित्या कंपन्यांच्या घशात देऊ शकतो तो अधिकारी उद्या चालून शहर, तालुका कंपन्यांच्या घशात घालू शकतो. तरी या अधिकाऱ्याला चौकशी करून बडतर्फ करुन चौकशी करण्यात यावी व कुटूंबी गावातील आदिवासींच्या जमीनी बेकायदेशिररित्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीला देण्यात आली व फेरफार करण्यात आले. त्यांच्या जमिनी त्यांना परत करुन फेरफार रद्द करण्यात यावी या प्रकरणात गैर अर्जदारावर कार्यवाही होण्यास दिरंगाई झाल्यास बिरसा ब्रिगेड तर्फे अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांना सोबत घेऊन बिरसा ब्रिगेडच्या पद्धतीने राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
असे आवाहन पत्रकार परिषदेत प्रदेश अध्यक्ष डॉ. पंकज कुळसंगे, रमेश मेश्राम, शुभम मडावी, भोला मडावी, धनराज कोवे यांनी केले आहे. या वेळी अन्यायग्रस्त आदिवासीची उपस्थिती होती.

दिनचर्या न्युज