अवैधरीत्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव

अवैधरीत्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या
वाहनांचा जाहीर लिलाव

चंद्रपूर दि.4 ऑगस्ट: तहसील कार्यालय, चंद्रपूर येथील पथकाद्वारे अवैधरीत्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांच्या वाहन मालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु काही वाहन मालकांनी त्यांच्यावर ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम त्यांना वाजवी संधी देऊनही अद्यापपर्यंत सरकार जमा केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदींना अधीन राहून सदर दंडाची रक्कम जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल करणे अपेक्षित आहे. या संबंधाने कुठलाही आक्षेप असल्यास सात दिवसाच्या आत तहसीलदार, चंद्रपूर यांच्या कार्यालयात आक्षेप नोंदवावे. असे चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड यांनी कळविले आहे.

दिनचर्या न्युज