शहरात महिलांचा प्रश्न ऐरणीवर, युवतीवर चाकूने जानलेवा हमला!
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध महाकाली मंदिर परिसरात 9 सप्टेंबर ला - सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास एका मुलाने आपल्या प्रेयसीवर चाकूने वार केले, हा सर्व प्रकार एका बार समोर घडला.वळदळीच्या परिसरातील मुख्य रस्त्यावर चाकूने जीवघेणा हल्ला झाला. यामुळे पुन्हा शहरातील मुलींना सुरक्षिततेच्या निर्माण झाला आहे.
सायंकाळी तरुण व तरुणींमध्ये बार समोर कडाक्याचे भांडण सुरू होते, अचानक 25 वर्षीय युवकाने त्या युवती वर चाकूने सपासप वार केले.
त्या मुलीच्या पोटावर, छातीवर व हातावर असे तब्बल 4 ते 5 वार करून मुलीला जखमी केले.
सदर माहिती शहर पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी बाबूपेठ निवासी प्रफुल मेश्राम लाअटक केली.
युवतीची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या परिसरात प्रेमविरांचे चांगलेच आसरा स्थान असून दिवसान दिवस हा प्रकार खूप मोठा प्रमाणात वाढत आहेत. अवैध धंदे सुद्धा होत असून या कडे पोलीस प्रशासनाने गस्त वाढवण्याची गरज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे युवक- युवती यांचं आपसात प्रेम प्रकरण सुरू होते. मात्र प्रेमात धोका मिळाल्याने हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली. दोघेही युवक व युवती बाबूपेठ परिसरातील रहिवासी आहे.
सध्या शहर पोलिसांनी कलम 307 अनव्ये आरोपी मेश्राम याच्यावर गुन्हा दाखल अटक केली आहे.