'अजीर्ण' वसंताला पायउतार करण्यासाठी दिलेला शब्द अखेर पाळला!





'अजीर्ण' वसंताला पायउतार करण्यासाठी दिलेला शब्द अखेर पाळला!

वसंता गटनेते पदावरून पायउतार, तर जयश्री जुमडे यांची गटनेते पदी वर्णी!


मनपातील भाजप वादळात अखेर वसंताचा बळी!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिका सभापति वाद गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय जनता पक्ष चंद्रपूर द्वारे सर्वस्वी असून. नियमाप्रमाणे व कोरोनामुळे जे काही शासन निर्देश आले त्याला अनुसरून पालिकेत नविन स्थायी समिती अध्यक्ष निवडणुक पुन्हा एकदा लागेल अशी अपेक्षा असताना जेंव्हा आश्चर्यचकित भाजप पक्ष श्रेष्ठी यांच्या आदेशाने हेतुपुरस्सर प्रभाग समिती निवडणुका घेतल्या जातात पण स्थायी समिती व महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष यांची निवडणूक घेण्यात येत नाही. तेंव्हा निश्चित काहीतरी घोड बंगाल असेल असे सर्वत्र चर्चा असताना आज दिनांक १४ सप्टेंबरला जे विभागीय आयुक्त यांचे अधीकृत पत्र हाती आले तेव्हा चंद्रपूर भाजप पक्ष श्रेष्ठी यांची भूमिका स्पष्ट झाली. आणि नवीन भाजप मित्र पक्षाच्या मनपात गटनेते पदी जयश्री जुमडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आणि वसंता देशमुख यांना पायउतार व्हावे लागले.
अजीर्ण वसंताला पायउतार का व्हावे लागले हे चंद्रपूरकरांना मागील सहा महीण्यापासून मनपात चालेल वादळ चांगलच माहीत आहे?
एखाद्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठीला आपल्याच पक्षाचा गटनेता बदलाविण्यासाठी १५ दिवस कालावधी लागत असेल तर निश्चित त्या पक्षश्रेष्ठीला तारेवरची कीती कसरत करावी लागली असेल याचा अंदाज येतो. ह्या अंदाजाचा प्रत्यय म्हणजे एकच की, वसंत देशमुख हया 40 वर्ष भाजप पक्षाला वाढविण्यासाठी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कार्य केले त्या कार्यकर्त्या विरूद्ध पक्षश्रेष्ठीला पायउतार करण्यासाठी चांगलीच दमछाक झालेली . म्हणून सरते शेवटी पक्षश्रेष्ठी यांना वसंत देशमुख ह्या निष्ठावान कार्यकर्ता साठीआपली स्वतःची प्रतिष्ठा खर्च करावी लागली. आशा आहे की, आता लवकरात लवकर स्थायी समितीची निवडणूक घेऊन पक्षश्रेष्ठी चंद्रपूर महानगर पालिकेत आपल्या मनानुसार स्थायी समिती सभापती बसवून स्वतःची खर्च केलेली प्रतिष्ठा एका नवीन चेहऱ्याला तोही काही वर्षांपूर्वी दलबदलून पक्षात प्रवेश केलेल्या सदस्याची मनपा स्थायी समितीच्या सभापती पदासाठी वर्णी लागणार अशी चर्चा शहरात सुरू आहे.