आशिष घुमे यांच्यावर १० लक्ष रुपयांचे मोफत उपचारगंभीर आजारात आ.सुधीर मुनगंटीवार यांची खंबीर साथ


गंभीर आजारात आ.सुधीर मुनगंटीवार यांची खंबीर साथ

आशिष घुमे यांच्यावर १० लक्ष रुपयांचे मोफत उपचार

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-

ऍनिमिया अतिशय गंभीर आजार,वेळेत निदान व तात्काळ योग्य उपचार मिळाल्यास हा गंभीर आजार बरा होऊ शकतो मात्र याच्यावर उपचार केवळ काही निवडक मोठ्या रुग्णालयात मिळतात,उपचारासाठी लागणार खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत ही मोठी अडचण....

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावचे रहिवासी आशिष घुमे यांच्या प्रकृतीला या आजाराचा विळखा पडला,उपचारासाठी लागणार आर्थीक भार ही मोठी समस्या निर्माण झाली, या अडचणीत माजी अर्थमंत्री व लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार धाऊन आले. त्यांच्या प्रयत्नामुळे रुग्ण आशिष मारोती घुमे यांच्यावर एनिमीया या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी १० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली व नामवंत ब्रिचकँडी रुग्णालय मुबंई येथे उपचारसाठी दाखल केले आहे . मागील अनेक दिवसांपासून रुग्ण आशिष घुमे हे उपचारासाठी करिता आर्थिकदृष्टीने हतबल होते....सुदैवाने त्यांना आता प्रगत उपचार सुरू झाले आहेत.

ईलाजकरिता आर्थिक अडचणीत सापडलेले घुमे कुटुंब यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना आजार व उपचारासाठी लागणारा खर्च याबाबत सविस्तर माहिती सांगितली , संवेदनशील आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पत्र लिहुन महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० मधील ४१ अन्वये १० % टक्के दुर्बल घटकातील निर्धन रुग्ण या योजनेतून मोफत इलाज करण्याबाबत विश्वस्त ब्रिज कँडी हॉस्पिटल यांना पत्राद्वारे मोफत इलाज करण्यासाठी विनंती केली होती .

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राची दखल घेत ब्रिच कँडी विश्वस्तांनी,मुबंईत हॉस्पिटलमध्ये मोफत इलाजकरिता आशिष घुमे यांना दाखल करून घेतले , आज उपचाराचा नववा दिवस असून तब्येतीत सुधारणा दिसत आहे. त्यामुळे घुमे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व रुग्णसेवक सागर खडसे मुबंई यांच्या सहकार्याने आशिष घुमे यांच्यावर होत असलेल्या मोफत ईलाजामुळे घुमे कुटुंबाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहे.