महानिर्मितीच्या बोगस जाहीरातीच्या नावाखाली बेरोजगारांची लुट

बेरोजगार युवकांना फसवणूक करणारी टोळी सक्रिय!

महानिर्मितीच्या बोगस जाहीरातीच्या नावाखाली बेरोजगारांची लुट।







प्रादेशिक वर्तमान पत्राला देण्यात आली होती बोगस जाहिरात !


चंद्रपूर :जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवकांना रोजगाराच्या झासा देवून वेगवेगळ्या शासकीय, तथा खाजगी कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध असल्याची बनावट जाहीरात, तथा संबधित विभागातील नियुक्ती पत्र देवून बेरोजगार युवक युवतिनी नौकरीचे लालच देवून मोहफासात लटकवून लाखोंचा गंडा मारल्याचे काही वर्षांपासून बेरोजगारांची लुट सुरू आहे. यात बेरोजगारांना फसवणूक करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याचे नाकारता येत नाही.

थर्मल पॉवर स्टेशन उर्जानगर येथील महानिर्मिती महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित उर्जानगर या नावाने डाटा ऑपरेटर या पदाकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने रेज्युम नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून त्या बाबतचे सविस्तर सुचना महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या http://www.maha.ganco.com या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही या जाहिरातीत सांगितले आहे. त्यामुळे अनेक बेरोजगारांना आपल्या हाताला काम मिळेल या उद्देशाने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या मात्र ती जाहीरातच बनावट असल्याचे कळताच अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला, ही जाहिरात एका दैनिकांत प्रसिद्ध झाल्याने ही जाहिरात बनावट असू शकतच नाही असे अनेकांना वाटत होते. मात्र ही जाहिरात बनावट असून सदर जाहीराती बाबत महानिर्मिती कंपनीचा काहीही संबंध नसून सदर जाहीराती अनुसरून कुणीही अर्ज सादर करू नये याबाबत महानिर्मिती कंपनी जबाबदार नसल्याचे महानिर्मिती कंपनीतर्फे खुलासा व्दारे सांगण्यात आले आहे. ही जाहीरात 8 आक्टोंबर रोजी दै. लोकमत या प्रादेशिक दैनिकात प्रसिद्ध झाली असून 16 आक्टोंबर ला यासंबंधातिल उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन या जाहिरातीत करण्यात आले आहे, यासंदर्भात चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राची उपमुख्य कार्यकारी ला यासंबंधातिल उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थीत रहावे, असे आवाहन या जाहिराती मधून करण्यात आले आहे, यासंदर्भात चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राची उपमुख्य कार्यकारी अभियंता यांनी सदर जाहिरात ही बोगस असल्याची माहिती खुलासा एका पत्राद्वारे केला आहे.