वेगवेगळ्या राज्यातील 115 दिव्यांग बांधवांनी आपल्या जोडीदाराकरीता दिला परिचय





वेगवेगळ्या राज्यातील 115 दिव्यांग बांधवांनी आपल्या जोडीदाराकरीता दिला परिचय

दिनचर्या न्युज :-
दि.14 नोव्हेंबर 2021 रोजी दिव्यांग उपवधू-वर परिचय सोहोळ्यात महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथून आलेल्या 115 दिव्यांग बांधवांनी आपला विवाह योग्य जोडीदाराच्या शोधात स्वताचा परिचय दिला. सर्व दिव्यांग बांधव आपल्या पालकांसह एक दिवस अगोदरच उपस्थित झाले.
आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा मागील 18 वर्षापासून स्व.गौरवबाबू पुगलिया दिव्यांग उपवधू-वर सुचक, पुनर्वसन व मार्गदर्शन केन्द्र वरोरा च्या माध्यमातून दरवर्षी दिवाळी नंतरचा दुसरा रविवारी दिव्यांग वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करीत आहे. कार्यक्रमाचे सातत्य, आजपर्यंत संस्थेने 365 दिव्यांग जोडीदारांचे विवाह जोडून मोफत विवाह लावून दिलेत व दिव्यांग बांधवांच्या क्षमता, योग्यता लक्षात घेऊन योग्य जोडीदार शोधण्याकरिता संस्थेचे कार्यकर्ते तथा चंद्रपूर शहरातील मित्रपरिवाराच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे या विश्वासाचेच हे फलित आहे की भारताच्या हिन्दी भाषिक राज्यासह महाराष्ट्रातील 65 अस्थिव्यंग, 19 दृष्ठीबाधीत, 31 कर्णबधीर मुलां-मुलींनी जोडीदार मिळावा या करीता परिचय दिला यात 15 दिव्यांग बांधवानी जोडीदार करीता प्रथम पसंती दाखवून पुढील बोलणी करीता स्वतःच्या निर्णयाचे आदान प्रदान केले. या मेळाव्याकरीता येणारा सर्व खर्च मा. श्यामबाबुजी पुगलिया यांनी केला.
गौरव सेलिब्रेशन लाॅन,चंद्रपूर येथे पार पडलेल्या या दिव्यांग वधु-वर परिचय मेळाव्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.नरेंद्रकुमार पुगलिया, प्रमुख अतिथी म्हणून मा.सुभाष शिंदे, श्रिमती नगिनाजी पुगलिया, श्रिमती गुंजनजी पुगलिया, श्रिमती भारती शिंदे, श्री. गौतमकुमारजी कोठारी ,श्री.दिपक करीया, नागपूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर एका प्रौढ दिव्यांग मुलाची पालक श्रिमती मनिषा पडगिलवार यांनी या सर्व दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी करण्याकरिता आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा चे कार्यकर्ते संजयकुमार पेचे, महेश भगत, रोहित पुगलिया, यशवंत देशमाने, विनोद भोयर, अविनाश गायधने, आतिष आक्केवार, अमोल मारोतकर, शिरिनाज पठाण तथा नागलोक बहुउद्देशीय संस्था,वरोरा चे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.