आगामी काळात होणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका , संघटना बांधणी, लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या - जयंत पाटीलआगामी काळात होणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका , संघटना बांधणी, लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या - जयंत पाटील

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक


दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-

चंद्रपूर येथे पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहून पक्ष संघटनेच्या सद्य परिस्थितीबाबत माहिती घेतली जिल्ह्यातील १५ तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्षांकडून तसेच ५ विधानसभा अध्यक्षांकडून पक्ष बांधणी तसेच आगामी जिप/पं.स./न.प. निवडणुकीच्या तयारीचा आढावा,पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांना येत असलेल्या अडचणींचा बाबत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व पक्ष वाढीसाठी उपस्थितांना सुचना केल्या.
आगामी काळात इथं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यादृष्टीने पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागायला हवे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यात सत्तेत आहे म्हणून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्राधान्य द्या असे पदाधिकाऱ्यांना सांगितले.
आज देशात प्रचंड महागाई वाढली आहे, नागरिकांमध्ये भाजपविरोधात एक नाराजीचा सूर आहे. या लोकांना आपल्याला राष्ट्रवादीचा पर्याय द्यायचा आहे. विदर्भातील शेतकरी व कष्टकरी यांच्या प्रगतीसाठी आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. पवार साहेबांच्या विचारांची बीजे आपण या मातीत रुजवूयात.
आपल्या बुथ संघटना अधिक बळकट करा, समाजातील प्रत्येक घटकांना आपल्या पक्षात समाविष्ट करून पक्षाचा अधिकाधिक विस्तार करा, असा संदेश उपस्थितांना दिला.*
यावेळी मा. खा. मधुकरराव कुकडे, आमदार श्री. मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रवक्ते मा. प्रविण कुंटे पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, श्री. सुबोध मोहिते, डॉ. अशोक जीवतोडे, श्री. मोरेश्वर टेमुर्डे,श्री. बाबासाहेब वासाडे आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.