विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या अनुष्का पाटीलची जुनियर जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी!







विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या अनुष्का पाटीलची जुनियर जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी!

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथील जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक विशाल कटकदौंड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारी अनुष्का पाटील हिने नुकत्याच पार पडलेल्या जम्मू काश्मीर येथील तिच्या पाहिल्याच जुनियर नॅशनल आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत बॅलन्सिंग बीम या क्रिडा प्रकारात सुवर्ण पदकासहित महाराष्ट्रासाठी महिलांच्या सांघिक रौप्य पदकाची कमाई करत वैयक्तीक पाचवा क्रमांक गाठून खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र संघात आपला पहिला प्रवेश निश्चित केला आहे.
तर मुलांच्या संघात निशांत करंदीकर आणि सार्थक राऊळ यांनीही प्रशिक्षक शुभम गिरी सोबत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून दिले आहे.




प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे श्री. अरविंद प्रभू (अध्यक्ष), डॉ. मोहन राणे (सचिव), नीलम बाबरदेसाई (जिम्नॅस्टिक्स विभागाच्या प्रमुख), पालक आणि संपूर्ण प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या सर्व परिवाराचे आभार आणि अभिनंदन !

दिनचर्या न्युज