नाभिक समाजाचे साहित्य संमेलन लांबणीवर






नाभिक समाजाचे साहित्य संमेलन लांबणीवर

कोरोना संक्रमणामुळे आयोजकांचा निर्णय*

दिनचर्या न्युज :-
अकोला : महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाच्या वतीने शेगाव येथे १५ जानेवारीला होऊ घातलेले नाभिक समाजाचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोना संक्रमण लक्षात घेता प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच पुढील तारीख जाहीर केली जाणार आहे.
यापूर्वी अमरावती येथे नोव्हेंबर २०१९ पहिले साहित्य संमेलन घेण्यात आले होते. नंतर कोरोना संक्रमणामुळे २०२० आणि २०२१ मध्ये दुसरे साहित्य संमेलन घेता आले नव्हते. परिस्थिती निवळल्याने संतनगरी शेगाव येथे आयोजन नाभिक समाजाचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन निश्चित झाले होते. पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सातारा येथील सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार आणि व्याख्याते कॅप्टन महेश गायकवाड हे या संमेलनाचे उद्घाटक आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील वाढते संक्रमण लक्षात घेता आयोजक कोअर समितीची ऑनलाईन बैठक शनिवारी रात्री पार पडली. यात सर्वानुमते संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. संमेलनाचे पाहुणे आणि स्थळ पूर्व नियोजनानुसार कायम राहणार असून लवकरच पुढील तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड. विलास वखरे, महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे अध्यक्ष शरद ढोबळे, उपाध्यक्ष मुकूंद धजेकर, सचिव सुनिताताई वरणकर यांनी कळविली आहे.