"नाळ" या मराठी सुप्रसिध्द चित्रपटाचे बाल कलाकार यांचा पत्रकारांसोबत मनमोकळा संवाद!

"नाळ" या मराठी सुप्रसिध्द चित्रपटाचे बाल कलाकार यांचा पत्रकारांसोबत मनमोकळा संवाद!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर -
सुप्रसिध्द मराठी चित्रपट "नाळ" याचे बाल कलाकार चैतू उर्फ श्रीनिवास कोकळे यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात सोमवारला मनमोकळा संवाद साधुन पत्रकारांचेच नव्हे तर प्रेक्षकांचेही मन जिंकले. त्यांनी नाळ या चित्रपटात आपली कशा पध्दतीने प्रवेश मिळाला याबददल सविस्तर माहिती दिली. महाराष्टाच्या घराघरातच नव्हे तर देशातच नाळ या चित्रपटाने घवघवीत यश मिळवून चैतू या बाल कलाकाराने "आई मला खेळाला जावू देणं वं! मि तुझे सगळेच काम करते नं वं!" असे म्हणून प्रत्येकाच्या ओठावर असलेले या गाण्याने बालकासस नव्हे तर मोठयांनाही वेड लावलेले होते. त्याचे त्यांनी यावेळेस अनुकरणही करुन दाखविले. आता त्याचे सध्या छुमंतर व निबंध या चित्रपटाचे चित्रीकरण झाल्याचे सांगितले. यासोबतही अनेक चित्रपट तयार होत असुन त्याचे नावही त्यांनी गुलदस्त्यात ठेवले. त्याचे स्वप्न होते की, मला मोठे झाल्यावर पायलट व्हायचे होते परंतू आता मला मोठा कलाकार व्हायचे आहे असे त्यांनी मनोगत व्यक्त केले. नाळ या चित्रपटाची सुटिंग चालु असतांना वासराने माझया पायावर पाय दिले त्यामध्ये मला थोडे रक्तही निघाले नदिच्या थंडया पाण्यामध्येही शुटींग करतांना होती अनुभव कथन केला. अशा प्रकारच्या अनेक किस्से तसेच दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी चित्रपटासाठी आम्हाला मनमोकळेपणाने घेवून कुठलाही राग नाही समजाची भुमिका घेवून चित्रपटात काम करुन घेतल्याचे सांगितले.