गडचांदुर अल्ट्राट्रेक सिमेंट कंपनीत कामगाराचा मृत्यू, कंपनीकडून नुस्कान भरपाई देण्यास टाळाटाळ !
 प्रेत  कंपनीच्या गेटवर  ठेवुनआंदोलन 
दिनचर्या न्युज :- 
कोरपना:-गडचांदूर माणिकगड सिमेंट कंपनीत आता नवीनच अल्ट्राटेक सिमेंट कंपनी या नावाने सुरू असून या ठिकाणी आज 26 जानेवारी ला दुपारी साडे दहा वाजता  प्रकाश देवाची पवार वय 43 वर्ष या कामगाराचा कामावर असतांना चक्कर येऊन मृत्यू झाला. याची माहिती वाऱ्या सारखी शहरात पसरली असून अनेक कामगार, सामाजिक संघटना व इतर पक्षातील पदाधिकारी यांनी रुग्णालयात धाव घेतली.कंपणिकडून  कामगाराला  नुसकान भरपाई देण्याची टाळाटाळ करीत असल्याने , योग्य  मोबदला मिळण्यासाठी  मुत्य कामगाराचे  शव  कंपनीच्या गेट समोर ठेवले असून  त्या ठिकाणी कंपनीच्या विविध कामगार संघटनांनी नुसकान भरपाईची मागणी करीत  आंदोलन सुरू आहेत. मात्र अजून पर्यंत कंपनीकडून कुठलाही निर्णय घेतल्या नसल्याची विश्वसनीय माहिती आहे.
 कामगाराच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई जो पर्यंत देण्यात येणार नाही, तो पर्यंत पोस्टमार्टम करू देणार नाही. असा सबळ इशारा कंपनीला व ठेकेदाराला देण्यात आला. 
 अनेक वर्षापासून  कंपनीत ठेकेदार पद्धतीत कामावर होता. कंपनीचे अधिकारी ठेकेदार मृत्यकाच्या नातेवाईकांशी विविध पक्षांच्या राजकीय पदाधिकारी व सामाजिक संघटना च्या वतीने नुकसान भरपाई बाबत मध्यस्ती सुरू आहे. बातमी लिहेपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 

 
 
 
 
