गडचांदूर पोलिसांची खुलेआम, राजरोसपणे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड !
गडचांदूर पोलिसांची खुलेआम, राजरोसपणे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड !

पर प्रांतातील जुगाऱ्यांसोबत स्थानिक जुगाऱ्यांना अटक!


अनेक दिवसांपासून सुरू होता व्यवसाय आमले साहेबांच्या नेतृत्वाखाली कारवाई!

दिनचर्या न्युज
गडचांदूर :-
गडचांदूर शहरातील ज्योतिबा फुले मार्केट येथील चिकन दुकानाच्या आड खुलेआम, राजरोसपणे
चालणाऱ्या जुगार अड्डा सुरू होता. गडचांदूर पूर्व ठाणेदार गोपाल भारती यांच्या आशीर्वादाने सुरू असलेला त्या जुगार अड्ड्यावर शनिवार दिनांक 29 रोजी कर्तव्यदक्ष ठाणेदार सत्यजित आमले यांच्या चमुनी मिळालेल्या माहितीनुसार धाड टाकली असता.
त्या ठिकाणी लागूनच असलेल्या तेलंगाना राज्यातील तिस, चाळीस अंदाजे जुगार शौकीन सोबत स्थानिक जुगार खेळणाऱ्यांना अटक केली असून मुंबई जुगार कायद्यांतर्गत व शासन जमावबंदी नियमांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती गडचांदूर की ठाणेदार सत्यजित आमले यांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील अनेक वर्षापासून त्याचा या क्षेत्रात थाटाने हा जुगार अड्डा सूरू आहे. गडचांदूर स्थानिक पोलीसाचे त्या ला अभय असल्याचे सांगण्यात येते.
जुगारात किती उलाढाल झाली याची माहिती अनभिज्ञ असुन, लवकरच गडचांदूर पोलीसांकडून यांच्या पडदाफास होईल. या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यात दहशत निर्माण झाली आहे.
माहिती देण्यास गडचांदूर पोलिसांचा नकार! सदर घटनेविषयी माहिती विचारली असता गडचांदूर पोलीस स्टेशनमधील स्टेशन डायरी वर असणारे यांनी अशी कोणती घटना घडली नाही? अशी चुकीची माहिती पत्रकारांना देत आपल्या प्रामाणिक - तेच्या पुरावा दिला. कर्तव्यदक्ष ठाणेदार आमले यांनी गडचांदूर येथील कार्यरत असलेल्या स्थानिक शिपायांना योग्य ती समज द्यावी अशी या निमित्त मागणी करावीशी वाटते.