पत्रकार दिन, राज्य महामार्ग पोलिसांकडून पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानपत्रकार दिन, राज्य महामार्ग पोलिसांकडून पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
दिनांक ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवशी पत्रकारांना , पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी संपादक जितेंद्र चोरडिया चांदा ब्लास्ट, संपादक दिनेश एकवनकर दिनचर्या, star महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी विकास मोरेवार यांचा सन्मान राज्य महामार्गाच्या पोलिसाकडन पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी एपीआय मोरे साहेब, एपीआय शरद मेश्राम साहेब, यांच्या सह महामार्ग पोलीस यांची उपस्थिती होती. पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देताना मेश्राम साहेब म्हणाले की, आपण पत्रकार नेहमीच पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका असावी, आपण दिलेली बातमी ही समाजाचा आरसा असतो. आपण दिलेल्या प्रत्येक घडामोडींकडे समाजाची वक्र दृष्टी असली पाहिजे. पत्रकारिता ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लेखणी आहे. यानिमित्ताने आपणास पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा देत आहे.