आमदाराने केले वनविभागाच्या नियमाचे उल्लंघन, वन विभाग कारवाई करेल का? की, नियम सर्वसामान्यांसाठीच ?


आमदाराने केले वनविभागाच्या नियमाचे उल्लंघन, वनविभाग कारवाई करेल का? की, नियम सर्वसामान्यांसाठीच ?


दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर : ताडोबातील कोअर आणि बफर मध्ये सफारी करताना वन विभागाने अनेक नियम पर्यटकांसाठी लागू केले आहेत. त्यात खास करून सफारी करताना पर्यटकांना स्वतःच्या जवळील मोबाईल गाईड्स गाडीतील बॉक्समध्ये ठेवण्यास मज्जाव करतात. हे नियम वन विभागाचे सर्व पर्यटकांना लागू असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील भाजप आमदार करण देवतळे यांना लागू नाहीत का? अशा प्रश्न आता सर्व पर्यटक धारक वन विभागाला विचारत आहेत . का! हे नियम सर्व सामान्यासाठीच आहेत का? वरोरा येथील आमदार करण देवतळे यांचा सोशल मीडियावर वायरल होत असलेला व्हिडिओ हा सध्या चर्चेचा विषय असून,ताडोबातील सफारीच्या नियमाचा भंग केल्याने वन विभागावर तासेरे ओढल्या जात आहे.
ताडोबा प्रशासनाचा नियमभंग केल्याची गंभीर बाब समोर आली. ताडोबा कोअर आणि बफर क्षेत्रात सफारी करताना मोबाईल जवळ बाळगणे नियमबाह्य असून असे केल्यास वन विभागाकडून पाच हजाराचा दंड ठोकवल्या जातो. असे फलकच वन परिसरात लावले गेले आहेत. मात्र आमदार करण देवतळे यांनी हे नियम धारेवर ठेवून आपल्या मोबाईलवर चक्क रिल तयार करून सोशल मीडियावर टाकली.पण असे करताना मोबाईल आरशात कैद झाला. जिप्सीच्या आरशात हा मोबाईल दिसून आला. त्यामुळे सफारी दरम्यान मोबाईलने शूटिंग केल्याचे स्पष्ट झाले. ताडोबा बफरच्या निमढेला गेटवरून आमदार देवतळे यांनी सपत्नीक सफारी केली. मात्र त्यात त्यांनी नियमभंग केला. सर्वसामान्य पर्यटकांना काटेकोर नियम लागू करणारे ताडोबा प्रशासन आमदार महोदयांवर आता काय कारवाई करती का?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी आणि पर्यटनाचा दर्जा टिकवण्यासाठी सफारीदरम्यान मोबाईल फोन वापरण्यावर व नेण्यावर सक्त मनाई आणि आदेश असे फलकच वन विभागाकडून लावण्यात आले आहेत.